Nagpur Crime : प्रेयसीला संपवून जंगलात पुरलं, दृष्यम स्टाईलने पोलिसांना चकवा दिला; कसा झाला हत्येचा उलगडा?

योगेश पांडे

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 08:23 PM)

Nagpur Crime : गेल्या काही वर्षापूर्वी अभिनेता अजय देवगण स्टारर दृष्यम नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अजय देवगणने एका तरूणाची हत्या केली होती. या हत्येनंतर अजयने बचावासाठी घटनास्थळापासून दुसऱ्याच ठिकाणी असल्याचे पुरावे पोलिसांसमोर सादर केले होते.अशीच काहीशी घटना आता नागपूरमध्ये घडलीय.

nagpur crime news indian army soldier kill his girl friend and misdirect nagpur police shocking crime story

पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

एका जवानाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना

point

हत्येनंतर जवानाने दृष्यम स्टाईलमध्ये पोलिसांना गुंगारा दिला

point

कसा झाला हत्येचा उलगडा

Nagpur Crime News : गेल्या काही वर्षापूर्वी अभिनेता अजय देवगण स्टारर दृष्यम नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अजय देवगणने एका तरूणाची हत्या केली होती. या हत्येनंतर अजयने बचावासाठी घटनास्थळापासून दुसऱ्याच ठिकाणी असल्याचे पुरावे पोलिसांसमोर सादर केले होते.अशीच काहीशी घटना आता नागपूरमध्ये घडलीय. या घटनेत एका जवानाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हत्येनंतर जवानाने दृष्यम स्टाईलमध्ये पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यात यश आले आहे. (nagpur crime news indian army soldier kill his girl friend and misdirect nagpur police shocking crime story) 

हे वाचलं का?

नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या हत्येतील आरोपीचे नाव अजय वानखेडे असे आहे, तो भारतीय सैन्यात कार्यरत आहे. अजय वानखेडे यांची मेंट्रीमोनिअल साईटवर जोत्स्ना आकरे या तरूणीशी भेट झाली होती. या भेटीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोघांनी अनेकदा संबंधही प्रस्थापित केले होते. तब्बल 2 वर्ष हा संपूर्ण प्रकार सूरू होता. 

यानंतर जोत्सनाने अजय वानखेडेवर लग्नाचा तगादा लावायला सूरूवात केली होती. पण दोनदा घटस्फोट झालेल्या वानखेडेने या लग्नास विरोध केला होता. पण या विरोधानंतरही लग्नाचा तगादा हा कमी होत नव्हता. त्यामुळे अखेर जवानाने प्रेयसीच्या हत्येचा कट रचला होता. 

हे ही वाचा : आई-बापाचं भांडण अन् पोराचा गेला जीव, बिबट्याने…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानाने प्रेयसीला बुटीबोरीजवळील एका निर्जनस्थळी नेले होते. येथे तिला दारू पाजली आणि बेशुद्ध झाल्यावर तिची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह जमिनीत पुरला होता. त्यानंतर पुरलेल्या ठिकाणावर झाडाचे पत्ते, फांद्या आणि दगड ठेवून घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तिथे कोणतीही गोष्टी पूरल्याचे कळू नये. मात्र तरी देखील पोलिसांना सुगावा लागलाच. 

जवानाने हत्या केल्यानंतर प्रेयसीचा मोबाईल हा वर्धा रोडवरून प्रवास करताना एका ट्रकमध्ये फेकून दिला होता. त्यानंतर जवान हा पुण्यात निघून गेला होता. जिथे त्याने स्वत:ला लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले होते. तर अजय हा आसाममधील वानखेडे येथील लष्करी रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करत होता.

या हत्येनंतर 29 ऑगस्टला बेलतरोडी पोलिस स्टेशनमध्ये तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर 17 सप्टेंबर रोजी अपहरणाच्या दृष्टिकोनातून प्रकरण बदलून ज्योत्सनाचा शोध सुरू करण्यात आला होता. या दरम्यान जोत्स्नाचा फोन सायबर तज्ज्ञांनी ट्रॅक केला असता, तिचा मोबाईल नेहमी लोकेशन बदलताना दिसत होता. त्यामुळे पोलिसांना सुरूवातीला आश्चर्य वाटले होते. 

हे ही वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी युपी मॉडेल का राबवला? Inside Story

त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी कॉल डिटेल्सवरून वानखेडेची चौकशी करायची होती. तेव्हा त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. नंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, पण तेथेही वानखेडेचे प्रकरण सुटले नाही. तसेच सूरूवातीला त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचाही प्रयत्न केला होता. घटनास्थळी रूग्णालयात असल्याचाही बनाव रचला होता. मात्र तरीही पोलिसांना त्यांच्यावरील संशय काही कमी झाला नाही. यानंतर वानखेडेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, परंतु पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, अजय वानखेडेने त्याच्या प्रेयसीची हत्या कशी केली आणि त्याला कुठे पुरले हेही सांगितले. 

या प्रकरणात आता पोलिसांना ज्योत्स्नाही हिची मृतदेहही जप्त केला आहे. आणि अजय वानखेडेलाही ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. 

    follow whatsapp