Pune News : पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (18 ऑक्टोबर 2024) रात्री घडली. मुलाचे आई-वडील आपापसात भांडत होते आणि याच दरम्यान चिमुकला घराबाहेर गेला. तो उसाच्या शेताकडे गेला असताना एका बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. (pune shirur news 7 year old child left home during parents fighting attacked by leopard)
ADVERTISEMENT
हे संपूर्ण प्रकरण पुण्यातील शिरूर तालुक्यातील आहे. बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. वंश राजकुमार सिंह असे चिमुकल्याचे नाव आहे. मांडवगन फर्ता गावात ही घटना घडल्याची अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
हेही वाचा : Tekchand Sawarkar : 'लाडकी बहीण योजना मतांचा जुगाड', तिकीट कापल्यावर पुन्हा तेच म्हणाले भाजप आमदार!
आई-वडील मुझफ्फरनगरचे रहिवासी
माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, चिमुकल्याचे आई-वडील उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पुण्यातील शिरूर तालुक्यात गुळ उत्पादन युनिटमध्ये काम करण्यासाठी ते येथे राहत होते. शुक्रवारी रात्री त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला.
वनाधिकारी म्हणाले, 'शुक्रवारी रात्री वंशच्या आई-वडिलांचं भांडण सुरू असताना तो एकटाच घरातून बाहेर उसाच्या शेतात गेला होता, तिथे झुडपात लपलेल्या बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापकाने पोलिसांना दिली आहे.'
ADVERTISEMENT