Baba Siddique Case : आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडला बाबा सिद्दींकीच्या मुलाचा फोटो, स्नॅपचॅटवरुन...

मुंबई तक

19 Oct 2024 (अपडेटेड: 19 Oct 2024, 02:04 PM)

Baba Siddique Case Updates : झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी झिशान सिद्दीकी यांना मारण्याचाही प्लॅन होता.

स्नॅपचॅटने पाठवला झिशान सिद्दीकींचा फोटो

स्नॅपचॅटने पाठवला झिशान सिद्दीकींचा फोटो

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकणात नवी अपडेट

point

स्नॅपचॅटपच्या माध्यमातून शूटर्स-सुत्रधाराचा संवाद

point

पोलिसांच्या चौकशीतून समोर आली मोठी माहिती

Baba Siddique Case Updates मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकणात रोज एक नवी अपडेट समोर येतेय. यातील अनेक गोष्टी या खळबळ उडवणाऱ्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशीही सुरू आहे. आठवडाभरापूर्वी बाबा सिद्दीकी यांची झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी झिशानला मारण्याचाही शूटर्सचा प्लॅन होता, मात्र ते गाडीत नसल्याने बचावले होते. त्यातच आता झिशान यांच्याबद्दलही आरोपींकडून मोठी माहिती समोर आली आहे. ( Zeeshan Siddique Photo founds in Baba Siddique Murder accused phone snapchat used in case )

हे वाचलं का?

हे ही वाचा >> CM Eknath Shinde यांच्या 10 विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार? कोणत्या आमदारांची नावं? सर्व्हे नेमका काय?

 

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींकडून सोशल मिडिया अॅप्सचा वापर झाल्याचं समोर आलंय. स्नॅपचॅट या अॅपच्या माध्यमातून या प्रकरणाच्या सुत्रधाराने झिशान सिद्दीकी यांचा फोटो शूटर्सला पाठवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तसंच याच माध्यमातून शूटर आणि मास्टर माईंड यांच्यात संवाद झाला होता असंही समोर आलंय. पोलिसांनी या प्रकरणात गुरमेलसिंग आणि धर्मराज कश्यप या आरोपींना अटक केलेली आहे. तर शिवकुमार गौतम हा अद्याप फरार आहे.तर चौथा संशयित हरीशकुमार निसाद यालाही उत्तर प्रदेशमध्ये अटक केकली असून मुंबईत आणण्यात आले आहे. 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी तीन जण हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमध्ये शूटर म्हणून सहभागी असलेल्यांनी चक्क युट्यूबवरुन पिस्तूल चालवण्याचे धडे घेतले. ही धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे. 

हे ही वाचा >> Baba Siddique : बाबा सिद्दीकींनंतर 'हा' अभिनेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?

 

दरम्यान, कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला मारण्याची धमकी दिली जातेय. तसंच मध्यंतरी सलमानच्या घरावरही गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आता सलमानचे नीकटवर्तीय असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे सलमान खान आणि त्याचं कुटुंबही चिंतेत आहे.

    follow whatsapp