Nagpur Police FIR : नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी FIR दाखल केला आहे. या FIR मध्ये दंगलीतील आरोपींनी केलेले गंभीर कृत्य समोर आले आहेत. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर संध्याकाळी काही मुस्लिम धर्मीयांनी पोलिसांना निवेदन देण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर याच जमावाने गोंधळ करायला सुरुवात केल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Nagpur Violence : "दूध आणायला गेलेला मुलगा व्हेंटीलेटरवर, रेल्वे पकडायला निघालेला भाऊ ऑक्सिजनवर"
पोलिसांनी या प्रकरणी 51 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या 57 कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टीचे फहीम खान यांच्या नेतृत्वात 50-60 लोकांचा जमाव बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनसमोर आल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.
FIR मध्ये काय काय उल्लेख?
- छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू-मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होण्याच्या उद्देशाने 500 ते 600 मुस्लिम लोक जमा झाले. या जमावाला घरी जाण्याच्या सुचना पोलिसांनी दिल्या.
- जमावातील लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आक्षेपार्ह विधानं करत "पुलीस को अभी दिखाते हे असं म्हणत घोषणा देत होते" खोट्या अफवा पसरवत होते.
- या जमावाने कुऱ्हाड, दगड, लाठी-काठी इतर घातक शस्त्रांच्या आधारे एकत्र येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.धर्माधर्मात शत्रुता वाढवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा >> Pune Bus Fire : चालती बस पेटली, सिमेंट ब्लॉकला धडकली, 4 जणांचा होरपळून मृत्यू, भयावह दृश्य समोर
- गणवेशातील पोलिसांवर धारदार शस्त्राने,ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघात हल्ला केला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करुन हाथबुक्कीने, दगडाने वेगवेगळ्या ठिकाणी मारुन जखमी केलं.
- महिला अंमलदारांना अंधाराचा फायदा घेत लैंगिग भावनेने विवस्त्र करण्याच्या उद्देशाने युनिफॉर्मला तसेच शरिराला स्पर्श केला.त्यामुळे त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.इतरही स्त्रियांना शिवीगाळ करत लैगिंग भावनेने त्यांच्यावर हल्ला केला.
- काही महिला कर्मचाऱ्यांना पाहून अश्लील इशारे करत अश्लील शेरेबाजी केली. पोलिस बूथ, दोन सी आर मोबाइल्स वाहने जाळली. लोकांच्या घरावर दगडफेक, वाहनं जाळली.
दरम्यान, नागपुरात दंगल घडवणारा मुख्य आरोपी म्हणून फहीम खान यांचं नाव समोर आलं आहे. नाव बाहेर, फहीम खान, शमीम खानच्या भाषणानंतरच नागपूर पेटलं असा आरोप आहे. 38 वर्षीय फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी, (MDP) नागपूर शहर अध्यक्ष, तो संजय बाग कॉलनी, यशोधरा नगर, नागपूर येथील रहिवासी आहे.
ADVERTISEMENT
