नायगावमधून (Naigaon) गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 29 वर्षीय मेकअप आर्टिस्ट नयना महंतची (Nayana Mahant Murder) हत्या झाल्याचे आता समोर आले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी कॉस्ट्यूम डिझायनर मनोहर शुक्लाला अटक केली आहे. मनोहर शुक्लाने आपल्या पत्नीसह मिळून प्रेयसी नयना महंतची हत्या केली आहे. 9 ऑगस्टला ही घटना घडली आहे. या घटनेचा आता उलगडा झाला असून नायगाव हादरलं आहे. (naigaon nayana mahant murder case police arrested costume designer and her wife shocking crime)
ADVERTISEMENT
नायगाव पुर्वेच्या सनटेक इमारतीत 29 वर्षीय नयना महंत राहत होती. नयना या इमारतीत एकटीच राहायची. नयना पेशाने एक मेकअप आर्टिस्ट होती. महिन्याभऱापुर्वीच नयनाच्या बहिणीने तिला फोन करायचा प्रयत्न केला होता. मात्र तिचा फोनच लागत नव्हता. त्यामुळे काळजीपोटी बहिणीने नायगाव पोलीस ठाणे गाठत,नयना महंत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर देखील नयनाचा महिनाभर तरी काहीच शोध लागला नाही. मात्र पोलीस या प्रकरणात नयनाचा शोध घेतच होते.मात्र त्यांच्या हाती देखील काहीच माहिती लागत नव्हते.
हे ही वाचा : Eknath Shinde: ‘आपण बोलून मोकळं व्हायचं ना…’, शिंदे-फडणवीसांचा ‘तो’ VIDEO का होतोय व्हायरल?
दरम्यान पोलिसांनी नयनाच्या बहिणीशी तिच्याबाबत चौकशी केली. यामध्ये नयनाचे मनोहर शुक्ला नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी नयनाच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. या तपासात पोलिसांना सीसीटीव्हीत एक जोडपं दिसलं. हे जोडप इमारतीत शिरताना तर रिकाम्या हाताने गेले होते. मात्र पतरताना ते एक सुटकेस घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे पोलिसांना त्या जोडप्यावर संशय बळावला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मनोहर शुक्ला आणि पौर्णिमा शुक्ला यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 29 वर्षीय नयना महंत मेकअप आर्टिस्ट होती. नयनाचे फिल्म सेटवर येणे-जाणे असायचे. या दरम्यान तिची ओळख कॉस्ट्यूम डिझायर मनोहर शुक्लाशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. प्रेमात पडल्यानंतर मनोहरचे नयनाच्या घरी येणे जाणे असायचे. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरु होते. या दरम्यान नयनाला मनोहरचे लग्न झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर नयना मनोहरशी नाते तोडत त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यामुळे मनोहर शुक्लाच्या अडचणी वाढल्या होत्या.
हे ही वाचा : Maharashtra : अकोल्यात झाला अनोखा फॅशन शो, नटून-थटून चक्क बकऱ्यांनीच केला रॅम्प वॉक
मनोहर शुक्लाच्या पत्नीला देखील पतीच्या या नात्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या नात्यात देखील वाद होऊ लागले होते. नयना आणि मनोहर यांच्यात दररोज भांडणे व्हायची. त्यामुळे आपला संसार वाचवण्यासाठी मनोहर आणि पौर्णिमाने प्रेयसी नयनाच्या हत्येचा कट रचला होता. मनोहर आणि पौर्णिमा दोघेही नयनाच्या रूमवर गेले आणि त्यांनी पाण्यात बुडवून नयनाची हत्या केली. या हत्येनंतर दोघांनी मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातच्या वलसाडच्या खाडीत फेकला होता.
या प्रकरणात पोलिसांनी आता मनोहर शुक्ला आणि पौर्णिमा शुक्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच या दोघांची आता कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT