Navi Mumbai Crime News : मासे कापण्याच्या सुऱ्याने मित्राचेच केले दोन तुकडे

नवीन पनवेलमध्ये मित्राचा शिरच्छेद केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला भोपाळ येथून अटक केली.

man killed his friend over money dispute in new panvel.

man killed his friend over money dispute in new panvel.

मुंबई तक

16 Jul 2023 (अपडेटेड: 16 Jul 2023, 12:19 PM)

follow google news

Maharashtra Crime News : हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्याच्या विकृत घटनांची मालिकाच गेल्या काही महिन्यांपासून देशात सुरू आहे. गर्लफ्रेंड, लिव्ह इन पार्टनरच्या हत्या महाराष्ट्र आणि देशात घडल्या. अशीच एक घटना नवीन पनवेलमध्ये घडली असून, या प्रकरणात मित्राची हत्या करून त्याचे शीर धडापासून वेगळं केलं. मृतदेहाचे दोन तुकडे करून एक भाग एका ठिकाणी, तर दुसरा नाल्यात फेकल्याचे तपासातून समोर आले. मित्राला संपवणाऱ्या आरोपीला पोलिसानी भोपाळमधून अटक केली. (man chopped head of his friend in new panvel)

हे वाचलं का?

पनवेल येथील मोहम्मद अस्लम हाशमद ही 42 वर्षीय व्यक्ती (आशियाना अपार्टमेंट, पनवेल) बेपत्ता असल्याची तक्रार 28 जून रोजी पोलीस ठाण्यात देण्यात आली. तक्रार दाखल झाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी याचा तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.

पोलिसांनी कसा केला तपास?

मोहम्मद अस्लम हाशमद यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाईलचे सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी केली. तपासणी करत असतानाच पोलिसांच्या असं निदर्शनास आलं की, बेपत्ता असलेल्या व्यक्तीला त्याचा मित्र शफिक हैदर याच्यासोबत पाहिलं गेलं. पोलिसांना याबद्दल खात्री झाली.

वाचा >> Wife Swapping : ‘तू माझ्या मित्रासोबत झोप, मी त्याच्या पत्नीसोबत…’, उच्चभ्रू सोसायटीतील घटना

पोलिसांनी शफिक हैदरबद्दल पोलिसांनी चौकशी केली. तो वडघर पनवेल येथे राहत असल्याचं आणि मोबाईल बंद करून त्याच्या मूळ गावी म्हणजे उत्तर प्रदेशात निघून गेल्याचं कळलं. त्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये त्याला चौकशीसाठी थांबण्यात आले.

वाचा >> Crime : ‘या’ अ‍ॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास

पोलिसांनी त्याची चौकशी केली पण तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच शफिक हैदरने केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की, मोहम्मद हशमद याच्याबरोबर पैशाच्या कारणावरून भांडण झालं आणि त्याने शिवीगाळही केली. याचा राग मनात धरून शफिक हैदरने त्याच्यावर मासे कापण्याच्या सुऱ्याने वार केला. त्याचे शिरच हैदरने धडापासून वेगळं केलं.

दोन ठिकाणी फेकला मृतदेह

आरोपीने चौकशी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद हाशमदची हत्या केली. धड वेगळं आणि शीर वेगळं केलं. त्यानंतर धड गोणीत भरून चिंचपाडा कळंबोली सर्विस रोडच्या डाव्या बाजूला फेकून दिले. तर मुंडके करंजाडे येथे नाल्यात टाकून दिले. पोलिसांनी धड जप्त केले आहे.

    follow whatsapp