Bajrang Sonawane: संतोष देशमुखांची हत्या का झाली? बजरंग सोनावणेंनी सांगितला 28 मे पासूनचा संपूर्ण घटनाक्रम

Bajrang Sonawane On Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी (SIT) ने आठ आरोपींना अटक केली आहे.

Bajrang Sonawane On Santosh Deshmukh Murder Case

Bajrang Sonawane On Santosh Deshmukh Murder Case

मुंबई तक

• 05:28 PM • 13 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली समोर

point

"28 तारखेला तक्रार दिल्यानंतर रमेश घुलेला अटक..."

point

खासदार बजरंग सोनावणे नेमकं काय म्हणाले?

Bajrang Sonawane On Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी (SIT) ने आठ आरोपींना अटक केली आहे. आरोपी विष्णू चाटेला आज केज अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत संतोष देशमुख हत्याप्रकरणाची खळबळजनक माहिती दिलीय.

हे वाचलं का?

खासदार बजरंग सोनावणे पत्रकार परिषदेत काय म्हणाले? 

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना बजरंग सोनावणे म्हणाले, "सर्वांना असं वाटतंय की पहिली घटना 9 डिसेंबरला घडली. पण याची सुरुवात 28 मे 2024 रोजी झाली. या दिवशी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला. म्हणजे 28 ला खंडणी मागितली आणि 29 ला केजला गुन्हा दाखल झाला. अवादा कंपनीचे सुनील केंदू शिंदे यांनी रमेश घुले व अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दिली. 28 तारखेला तक्रार दिल्यानंतर रमेश घुलेला अटक झाली. जामीन झाली पण अनोळखी कोण आहे? ते पोलिसांनी ओळखलेलं नाही किंवा त्यावर पोलीस काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ आहे, अनोळखी जो आहे, त्याच्याबद्दल वाच्यता करायची नाही, असं त्यांना सांगितलं. पण 28 तारखेला जी घटना घडली, 29 ला याची फर्याद घेतली. म्हणून रमेश घुले नावाचा व्यक्ती कुठेही पिक्चरमध्ये आला नाही.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला सरकारी वकीलच अनुपस्थित?

सोनावणे पुढे म्हणाले, "पोलिसांनी वेळीच कारवाई केली म्हणून तो विषय संपला. पण त्यानंतर 6 डिसेंबरला अवादा कंपनीच्या यार्डमध्ये मारामारी झाली, असं प्रथमदर्शी दिसतंय. पण याची सुरुवात 29 नोव्हेंबर 2024 रोजी झाली. या दिवशी दोन कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा एफआयर 11-12 तारखेला झाला आहे. या खंडणी झाली नाही. पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही. यासाठी त्यांना अवादा कंपनीत जाऊन सर्व गुंड पाठवून मारामारी करून दहशत निर्माण करण्याचं काम या 7 लोकांनी केलं. वॉचमन सेक्युरीटी देण्याच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट बीड जिल्ह्यातील बाहेरच्या व्यक्तीला दिलं आहे. मस्साजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे. केज तालुक्यात सुद्धा कंपन्या आहेत. हे काम कशासाठी केलं जातंय, याचा छडा लावला पाहिजे. हा कोण आहे? ज्याला या कंपनीचं सेक्युरिटी पुरवण्याचं काम दिलंय. हे सुद्धा तपासण्याची वेळ आहे".

तिथे जे सेक्युरिटी गार्ड होते, त्या गार्डला मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता, पोलिसांनी साधा नॉमिनल गुन्हा दाखल करून घेतला. नॉमिनल गुन्हा दाखल करून त्यांना सोडून दिलं आणि त्यांना राग आला. या खंडणीखोरांना कुणा  कुणाला फोन आला? आता खंडणीचा जो आरोपी जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांड मध्ये आहे. तो 29 ला केजमध्ये होता. केजमध्ये त्याने एका रजिस्ट्री ऑफिसमध्ये एका प्लॉटची रजिस्ट्री करून घेतली.

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh : जरांगेंचा फोन, पोलिसांचं आश्वासन... धनंजय देशमुख खाली उतरायला तयार

9 नोव्हेंबरपासूनचे सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला सर्व कळेल. 29 ला जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, त्यावेळी गुन्हा दाखल झाला असता तर आमच्या संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता. ही बाब सर्वात चुकीची आहे. येथील डीवायएसपींनी जर वेळीच अॅट्रोसीटी दाखल करून घेतली असती तर कदाचीत आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर झाला नसता. येथील डीवायएसपीही याला दोषी आहेत. पाटील नावाच्या पीआयचं फक्त निलंबन केलंय. त्याला सहआरोपी करा, अशी माझी दुसरी मागणी आहे. यांचे सर्वांचे कॉल डिटेल्स काढा, मग तो कशा कशात आरोपी आहे ते कळेल, असंही बजरंग सोनावणे म्हणाले.


 

    follow whatsapp