IAS Pooja Khedkar Mother Manorama Khedkar arrested: (ओंकार वाबळे, पुणे): वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना आज (18 जुलै) सकाळी रायगडमधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्या बंदूक हातात घेऊन एका शेतकऱ्याला जमिनीबाबत धमकावत असल्याचं समोर आलं होतं. (police take big action against ias pooja khedkar mother manorama Khedkar arrested in the case of threatening a farmer)
ADVERTISEMENT
आता हेच प्रकरण मनोरमा खेडकर यांना भोवलं असून पौड पोलिसांच्या पथकाने आज सकाळी रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केली.
'ही' गोष्ट मनोरम खेडकरांना भोवली!
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पंढरीनाथ पासलकर यांनी फिर्याद दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पौड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूजा खेडकर यांच्या IAS भरतीबाबत सवाल उपस्थित होत असतानाच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत मनोरमा खेडकर या एका शेतात जात एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावत असल्याचं पाहायला मिळालं होतं.
मनोरमा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप
मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध 12 जुलै 2024 रोजी या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. तक्रारदार पासलकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं की, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील धडवली येथे सर्व्हे क्रमांक 12/1 आणि 15/1 मध्ये सामाईक जमीन आहे. 2006 मध्ये मनोरमा दिलीप खेडकर यांनी धडवलीमध्ये सर्व्हे क्रमांक 12/1 आणि 15/1 मधील काही जमीन खरेदी केली. पूजा खेडकर यांच्या वतीने मनोरमा खेडकर यांनी ही जमीन खरेदी केली होती.
हे ही वाचा>> Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरांचा नवा प्रताप, MBBS प्रवेशासाठी केला होता मोठा झोल?
पुण्यातील शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात या प्रकरणात दावा दाखल आहे. या जमिनीची रखवालदारी नागू मरगळे यांचे कुटुंबीय करते. ते त्या ठिकाणीच राहतात. दरम्यान, 4 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता समारूती नागू मरगळे हे त्यांच्या कुटुंबासह शेतात असताना मनोरमा खेडकर, तिचा पती दिलीप खेडकर आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी दोन कंटेनर बॉक्स आणले आणि ते आमच्या शेतात ठेवले. पण त्याचवेळी मारूती मरगळे यांनी विरोध केला.
त्यांनी (मनोरमा खेडकर) मारूती मरगळे आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. दमदाटी आणि धक्काबुक्कीही केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर दोन्ही कंटेनर बॉक्स आमच्या शेतात ठेवून निघून गेले.
5 जून 2023 रोजी मी माझ्या दोन भाचे आणि पुतण्यासह धडवलीला गेलो. मनोरमा खेडकर यांनी ठेवलेले कंटेनर शेतातून काढून टाकले. त्या दिवशी सायंकाळी 4 वाजता मनोरमा खेडकर त्यांच्यासोबत दोन पुरूष, दोन महिला आणि अंबादास खेडकर अशा गुंडांना घेऊन आल्या.
हे ही वाचा>> IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब; पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट!
मनोरमा खेडकर गाडीतून उतरल्या. हातात पिस्तुल धरून त्यांनी वाद घातला. माझ्यावर पिस्तुल रोखले. त्या पुन्हा कंटेनर आमच्या शेतात ठेवू लागल्या तेव्हा आम्ही त्यांना विरोध केला. कंटेनर आमच्या शेतात ठेवले तर काढून टाकू असे आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी पिस्तुल रोखत जीवे मारण्याची धमकी दिली. असे पासलकर आपल्या यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल दाखवल्याने आणि त्यांच्यासोबत लोक आणल्याने आम्ही घाबरून गेलो होतो. पण, १२ जुलै रोजी टीव्हीवर मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ बघितल्यानंतर तक्रार दिली. असंही पासलकर यांनी म्हटलं
IAS पूजा खेडकरांच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल
मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, त्यांच्यासोबत आलेले दोन पुरूष, दोन महिला आणि इतर गुंड यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहिता ३२३, ५०४,५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, शस्त्र अधिनियम ३, शस्त्र अधिनियम २५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता मनोरमा खेडकरांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT