पुण्यात टोळक्यांचा थरार! IT इंजिनिअरच्या कुटुंबाचा 40 जणांकडून जीवघेणा पाठलाग, CCTV मध्ये कैद

रोहिणी ठोंबरे

03 Oct 2024 (अपडेटेड: 03 Oct 2024, 05:51 PM)

IT Engineer Attacked Pune News : पुण्यात नुकतीच एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात नुकतीच एक थरकाप उडवणारी घटना घडली

point

IT इंजिनिअर रवी कर्नानी यांच्या कुटुंबासोबत हा भयानक प्रकार

point

हातात लाठ्या, रॉड आणि दगड घेऊन कर्नानी यांच्या कुटुंबाचा 40 लोकांच्या टोळक्याकडून जीवघेणा पाठलाग

IT Engineer Attacked Pune News : पुण्यात नुकतीच एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक कुटुंब मध्यरात्री कारमधून प्रवास करत असताना हातात लाठ्या, रॉड आणि दगड घेऊन त्यांचा 40 लोकांच्या टोळक्याने जीवघेणा पाठलाग केला आहे. हा संपूर्ण प्रकार कारमध्ये असलेल्या CCTV मध्ये कैद झाला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या. (pune crime it engineer and family attacked by 40 people gang on lavale nande road viral video social media )

हे वाचलं का?

ही घटना 29 सप्टेंबर रोजी घडली आहे. IT इंजिनिअर रवी कर्नानी यांच्या कुटुंबासोबत हा भयानक प्रकार घडला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवळे-नांदे रस्त्यावरून प्रवास करत असताना जवळपास 40 लोकांच्या टोळक्याने त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनीही मदत केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Horoscope In Marathi :  नवरात्रीच्या उत्सवात 'या' राशींचं खुलणार नशीब! कुणाला मिळणार भरमसाट पैसा? वाचा एका क्लिकवर

 

कर्नानी यांनी या घटनेचा हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे. यादरम्यान रात्रीच्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुसगाव, पुणे येथील रहिवासी रवी कर्नानी हे 29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1:56 वाजता लवळे-नांदे रोडवरून जात असताना कार आणि मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबण्यास सांगितले. कर्नानी न थांबल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांच्या हातात लाठ्या, रॉड आणि दगड होते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक ठिकठिकाणी हत्यारांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करत आहेत. गाडीत बसलेली महिला घाबरलेल्या अवस्थेत देवाचे नाव घेताना ऐकू येतेय.

यानंतर कर्नानी दावा केला आहे की, या भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांनीही त्यांना मदत केली नाही. कसातरी जीव वाचवून ते तिथून निसटले. त्यांच्या तक्रारीवरून आता पौड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : Maharashtra weather: राज्यात 'ऑक्टोबर हिट'ला सुरूवात? 'या' जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा!

कर्नानी असंही म्हणाले की, “हा हल्ला तिथल्या स्थानिक टोळीनेच घडवून आणला असावा. ही टोळी अनेकदा स्थानिक नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना लक्ष्य करते.” त्याचबरोबर कारचे किती नुकसान झाले आहे याचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

    follow whatsapp