Pune Crime : पुण्यातील वाघोली येथील मल्हार डोंगराच्या पायथ्याशी दोन दिवसापूर्वी एका 35 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. या हत्येचा उलगडा झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. यात आणखी एका आरोपीचा समावेश असून, त्याचा शोध लोणीकंद पोलीस घेत आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना घटनेचं कारण शोधण्यात यश आलं आहे.
ADVERTISEMENT
गौरव सुरेश उरावी (वय 35) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भगवान केंद्रे (वय 23, रा. परतापूर, जि. धारशिव) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जेवण करून घराबाहेर पडला अन् मृतदेहच सापडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गौरव उरावी हा खराडी येथील एका सोसायटीमध्ये मित्रासोबत राहत होता. तो एका आयटी कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याच कामाच्या निमित्ताने नेहमी चारचाकी वाहनांमधून प्रवास होत होता.
हेही वाचा >> Ahmednagar : शेवगावमध्ये दोन गट भिडले! तुफान दगडफेक, वाहनांची तोफफोड
दरम्यान, आरोपी भगवान केंद्रे याच्या चारचाकी वाहनांमधून मयत गौरव याने अनेक वेळा प्रवास केला. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्याच दरम्यान मयत गौरवने आरोपी भगवान याच्याकडून तीन हजार रुपये घेतले होते. मात्र ते पैसे देण्यास गौरव हा टाळाटाळ करीत होता.
त्याच दरम्यान शुक्रवारी रात्री जेवण करून येतो, असे गौरवने मित्रांना सांगून राहत असलेल्या घराबाहेर पडला. त्यानंतर मयत गौरव हा आरोपी भगवान केंद्रे याला भेटला. त्यानंतर गौरव हा भगवान केंद्रे सोबत असलेल्या एका मित्रासोबत वाघोली येथील मल्हार डोंगराच्या पायथ्याशी गेला.
त्यावेळी आरोपी भगवान केंद्रेने मयत गौरव याच्याकडे पैसे मागितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी भगवान केंद्रे आणि त्याच्या सोबत असलेल्या मित्राने मयत गौरव याच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यामध्ये गौरव याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
हेही वाचा >> Karnataka : डीके शिवकुमार यांचे भाकीत ठरलं खरं! 128 दिवसांपूर्वी म्हणाले होते…
त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी भगवान केंद्रे आणि त्याचा साथीदार पसार झाले. तर ही घटना सकाळी उघडकीस आल्यावर भगवान केंद्रे याने खून केल्याची माहिती समोर येताच पुढील काही तासात आरोपी भगवान केंद्रे याला कळंब येथून अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT