Pune Murder: पुण्यात एका धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका बंद फ्लॅटमध्ये तरुण जोडप्याचे मृतदेह (Dead Body) आढळून आले असल्याने लोहगाव (Lohgaon) परिसरासह येथील नागरिकांना धक्का बसला आहे. लोहगावमध्ये भाडोत्रा म्हणून राहणाऱ्या 23 वर्षाचा तरुण आणि त्याच्या 21 वर्षाच्या पत्नीचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आला. दोघांचेही मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्याची तपासणी केल्यानंतर दोघांचेही हात बांधललेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळून आले आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौकशी सुरु केली असून तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
दोघांचीही नोकरी कंत्राटी
फ्लॅटमध्ये दोघा पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, या दोघांची नाव किरण महादेव बोबडे ( वय 23) आणि आरती महादेव बोबडे (21) असून ही दोघंही नोकरी करत होती. किरण बोबडे हा कंत्राटी तत्वावर काम करत होता, तर आरती ही एका खासगी बॅंकेत काम करत होती.
घरातून दुर्गंधी
लोहगावमध्ये असलेल्या फ्लॅटमधून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सकाळी 11 वाजता पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरु केला. यावेळी नागरिकांनी सांगितले की, गेल्या दोन तीन दिवसांपासून या दोघांनीही फ्लॅट उघडला नाही, त्यानंतर आता त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे सोसायटीतील लोकांनी सांगितले.
हे ही वाचा >>Prahlad Patel: भीषण अपघात, केंद्रीय मंत्री थोडक्यात बचावले; दुचाकीस्वाराची दुर्दैवी मृत्यू
दोघांचेही मृतदेह सडून गेले
ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी किरण आणि आरती या दोघांचेही मृतदेह पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. त्यावेळी दोघाही पती-पत्नीचे हात बांधलेल्या अवस्थेत होते, तर दोघांचेही मृतदेह सडून गेले होते असंही पोलिसांनी सांगितले.
नेमकं कारण समजलं नाही
पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, फ्लॅटमध्ये घुसून त्यांची कोणी हत्या केल्याच्या खाणाखुणा कोणत्याही प्रकारच्या दिसून येत नाहीत. कारण आतून दरवाजा बंद होता व खिडक्याही बंद होत्या. त्यामुळे आता शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालानंतरच नेमकं हे प्रकरण काय आहे ते कळणार आहे. तसेच या दोघांनीही प्रेमविवाह केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून या दोघांच्याही मृत्यूचं नेमकं कारण अजून समजू शकले नाही.
ADVERTISEMENT