Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर

मुंबई तक

24 Jun 2023 (अपडेटेड: 24 Jun 2023, 07:23 AM)

पुण्यात झालेल्या दर्शना पवारच्या हत्ये प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. राहुल हांडोरेने दर्शनाची दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

New information has now come to light in the case of Darshana Pawar's murder in Pune. Police sources have informed that Rahul Handore killed Darshan by crushing him with a stone.

New information has now come to light in the case of Darshana Pawar's murder in Pune. Police sources have informed that Rahul Handore killed Darshan by crushing him with a stone.

follow google news

Darshana Pawar Murder: पुणे: MPSC परीक्षेत (MPSC Exam) राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार (Darshana Pawar) हिच्या हत्येने राज्यात खळबळ माजली. याच प्रकरणातील तिचा आरोपी राहुल हांडोरेच्या (Rahul Handore) अटकेनंतर नवनवे खुलासे होत आहे. आतापर्यंत दर्शनाची हत्या (Murder)नेमकी कशी झाली होती हे समोर आलं नव्हतं. मात्र याबाबतची काही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. राहुलने स्वत: कबूल केलं आहे की, त्यानेच दर्शनाची हत्या केली. पण ही हत्या त्याने कशी केली याबाबत पोलिसांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे. (pune mpsc darshana pawar murder accused rahul handore stone sharp weapon police investigation Shocking information crime news)

हे वाचलं का?

दर्शना आणि राहुल यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच होती. दर्शना पवारचे वडील हे कोपरगावमधील साखर कारखान्यातील एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात तर राहुल हांडोरेचे वडील नाशिकमध्ये पेपर स्टॉल चालवतात.

राहुल हांडोरेने हा विज्ञान शाखेतून पदवीधर झाला आहे. तसंच तो मागील काही दिवसांपासून MPSC परीक्षेची देखील तयारी करत होता. पण याचवेळी तो त्याच्या शिक्षण आणि राहण्याचा खर्च भागावा म्हणून तो ऑनलाइन फूड डिलिव्हरीचं कामंही करायचा.

हे ही वाचा >> Pune, MPSC: राहुलसोबत लग्नाला नकार, दर्शना पवारच्या कुटुंबीयांनी नव्हे तर…

दर्शना आणि राहुल हे एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. त्यांनी MPSC परीक्षेची तयारी देखील एकत्रच सुरू केली होती. मूळातच हुशार असलेल्या दर्शनाने पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा पास केली. एवढंच नव्हे तर तिने राज्यात तिसरा येण्याचा मान देखील पटकावला. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची नेमणूक देखील झाली होती. मात्र अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारण्याआधीच राहुलने तिची निर्घृण हत्या केली.

राहुल हांडोरेने नेमकी कशी केली दर्शनाची हत्या?

राहुल हांडोरोला दर्शनासोबत लग्न करायचं होतं. पण दर्शनाच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी दुसरीकडे स्थळं पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच जेव्हा राहुलने राजगडाच्या पायथ्याशी तिला लग्नाबाबत विचारलं त्यावेळी तिने लग्नास थेट नकार दिला. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने राहुलने तिथेच दर्शनाची हत्या केली.

राजगडावर ट्रेकिंगच्या निमित्ताने गेलेल्या राहुलने दर्शनाला सतीच्या माळावर नेलं आणि तिकडे काही वेळ त्यांनी गप्पागोष्टी केल्या. याच वेळी त्याने दर्शनाला लग्नासाठी विचारणा केली. पण दर्शनाने त्याला नकार दिला. हाच राग डोक्यात ठेवून राहुलने दर्शनाची दगडाने हत्या केली. यावेळी त्याने दगडाने दर्शनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. तसेच त्याच्या जवळच्या धारदार हत्याराने तिच्यावर जीवघेणे वार केले.

शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात ही गोष्ट स्पष्ट झाली की, दर्शनावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तसेच तिच्या डोक्यावर देखील दगडाने प्रहार करण्यात आला होता. शवविच्छेदनाचा संपूर्ण अहवाल हाती आल्यानंतर ही हत्या नेमकी कशी झाली याबाबतची अधिक माहिती समोर येईल जी पोलिसांना तपासासाठी उपयुक्त ठरू शकते.

दर्शनाची दगडाने ठेचून हत्या?

घटनास्थळी पोलिसांना रक्त लागलेला दगडही आढळून आला आहे. आता पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत की, याच दगडाने राहुलने दर्शनाची हत्या केली का? कारण तिच्या डोक्यावर मार लागल्याच्या खुणा आहेत. तसेच तिच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्याही खुणा आहेत. मात्र, कोणत्या धारदार शस्त्राने ही हत्या करण्यात आली ते अद्याप पोलिसांना समजू शकलेलं नाही किंवा ते हत्यार मिळालेलं नाही. हे धारदार हत्यार नेमकं काय होतं, ते त्याने राजगडावर जातानाच सोबत घेतलं होतं का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीच आहेत.

राहुल आणि दर्शनाने ज्या बाइकवरुन प्रवास केला होता ती बाइक देखील अद्याप सापडू शकलेली नाही. दर्शनाच्या हत्येनंतर या बाइकचं राहुलने काय केलं याचाही पोलीस तपास करत आहेत.

हे ही वाचा >> क्लासमेट, अफेअर आणि MPSC पास झाल्यावर दूर गेली… म्हणून राहुलने केली दर्शनाची हत्या!

राहुलने दर्शनासोबत जाण्याचा प्लॅन कधी केला. दर्शनाला मारण्याचं केव्हा ठरवलं?, राहुल आणि दर्शना यामध्ये आधी देखील लग्नाबाबत चर्चा झाली होती का? असे अनेक प्रश्न आता पोलीस राहुलला विचारतील. ज्यामधून या प्रकरणातील नेमकी माहिती समोर येऊ शकते.

राहुलने ज्यावेळी दर्शनाची हत्या केली त्यावेळचा साक्षीदार अद्याप तरी कोणी नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पण ज्यावेळी राहुल आणि दर्शना राजगडाच्या दिशेने गेले त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालं आहे. तसंच परत येताना राहुल हा त्याचा बाइकवर एकटाच असल्याचं दिसून येत आहे. आता या सगळ्या प्रकरणी पोलीस राहुलकडूने वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

    follow whatsapp