Pune Accident : दोघांना उडवलं; बापाला बेड्या अन् पबमधला 'तो' व्हिडिओ... वाचा Detail Story

मुंबई तक

22 May 2024 (अपडेटेड: 22 May 2024, 06:09 PM)

Pune Accident News : अल्पवयीन आरोपीचे पबमधील दारू पितानाचे व्हिडिओ देखील समोर आले होते. पण पोलिसांकडून रक्ताच्या नमुन्याचा अहवाल यायला उशीर होत होता.त्यात आरोपीला पोलीस स्टेशनला पिझ्झा, बिर्याणी खाऊ घातल्याचाही आरोप झाला होता.त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत होता.

pune porsche car accident two killed builder vishal agarwal arrested police custody pune accident inside story

पुणे अपघाताचा संपुर्ण घटनाक्रम

follow google news

Pune Accident News : पुण्यातील अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. या घटनेवर सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. या घटनेत वापरलेल्या पोर्शे गाडीपासून (Pune Porsche Car Accident), पबमध्ये दिलेला प्रवेश ते अल्पवयीन मुलाचा जामीन वादात सापडला होता. श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी कायद्यांची पायमल्ली केल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान ही संपुर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात.  (pune porsche car accident two killed builder vishal agarwal arrested police custody pune accident inside story) 

हे वाचलं का?

पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन आरोपी त्यांच्या मित्रांसह भरधाव पोर्शे कार पळवत होता. या दरम्यान दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना या पोर्शे कारची भीषण धडक बसते. ही धडक इतकी जोरदार असते की बाईकमागे बसलेली मुलगी सात ते आठ फुट उंचावर उडून दुरवर फेकली जाते आणि जमिनीवर आपटते. तसेच दुचाकी चालवत असलेस्या तरूण देखील या अपघातात गंभीर जखमी होतो.

अपघाताच्या या घटनेनंतर स्थानिक नागरीक जमा होतात. याच दरम्यान आरोपी गाडीतून उतरताच स्थानिक नागरीक त्याला बेदम चोप देतात आणि दोन्ही अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करतात. मात्र रुग्णालयात दाखल होण्याआधीच दोघांचा मृत्यू होतो. अश्विनी कोस्टा (24 वर्ष) आणि अनीश अवधिया (24 वर्ष) अशी या मृतांची नावे होती. हे दोघेही मध्यप्रदेशच्या जबलपूर आणि उमरीया भागात राहायचे. त्यामुळे या अपघाताच्या घटनेने दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. 

हे ही वाचा : शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"!

दरम्यान या घटनेनंतर येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यानंतर सुट्टीच्या दिवशी कोर्ट चालवून अल्पवयीन आरोपीला 14 तासांत जामीन मंजुर झाला. त्यामुळे दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 14 तासांत जामीन कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. तसेच आरोपीला जामीन देताना 300 शब्दाचा निबंध लिहण्याची शिक्षा आणि पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहुन वाहतुकीचे नियोजन करण्याची शिक्षा दिली होती. या शिक्षेवरून देखील नागरीकांमध्ये  संताप होता. 

विशेष म्हणजे अल्पवयीन आरोपीचे पबमधील दारू पितानाचे व्हिडिओ देखील समोर आले होते. पण पोलिसांकडून रक्ताच्या नमुन्याचा अहवाल यायला उशीर होत होता.त्यात आरोपीला पोलीस स्टेशनला पिझ्झा, बिर्याणी खाऊ घातल्याचाही आरोप झाला होता.त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत होता. 

हे ही वाचा : 'तसला' Video पाहून अल्पवयीन भावा-बहिणीमध्ये शरीरसंबंध, नंतर...

आरोपीला दिलेल्या शिक्षेवरून हे प्रकरण पेटलं होते. त्यात त्याच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हता. त्याच्याकडून मद्यधुंद अवस्थेत हा अपघात घडला होता. आणि ज्या पोर्शे कारने धडक दिली, त्या कारची नोंदणीही झाली नसल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र परिवहन विभागाने सांगितले की, 1,758 रुपये शुल्क न भरल्याने कारची नोंदणी मार्चपासून प्रलंबित आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या नोंदीनुसार, कार मालकाकडे कर्नाटकने जारी केलेले वैध पण, तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आहे, ज्याची वैधता मार्च ते सप्टेंबर 2024 पर्यंत अशी सहा महिन्यांची आहे

या घटनेत सगळ्याच गोष्टीत कायद्यांचे उल्लंघन झाले होते. अपघात ग्रस्त कारची नोंदणी नव्हती. आरोपीकडे वाहन परवाना नव्हता. तसेच तो अल्पवयीन असताना देखील त्याला बार आणि पबमध्ये प्रवेश दिला गेला होता. त्यानंतर हे प्रकरण प्रचंड तापताच पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल पाटील यांना संभाजीनगरमधून अटक केली. तर आज त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन आरोपीला देखील न्यायालयात हजर करण्यात आले होते. पण त्यांच्या शिक्षेचा निर्णय़ राखून ठेवण्यात आला आहे. 

आरोपीला किती शिक्षा होणार? 

अशा प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास मुलाच्या वडिलांना तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे सुप्रीम कोर्टाचे वकील रुद्र विक्रम सिंह यांनी म्हटले आहे. पण प्रश्न असा पडतो की ज्याने दोन जणांना चिरडून ठार केले त्या अल्पवयीन आरोपीचे काय होणार? तर हे प्रकरण अपघाताचे आहे, जे कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही, त्यामुळे या प्रकरणात अल्पवयीन व्यक्तीला कठोर शिक्षा होईल अशी आशा कमी आहे, रुद्र विक्रम सिंह म्हणतात. 

    follow whatsapp