Pune Crime News : पुण्यात किरकोळ वादातून 15 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे, या मुलाला मारणारा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून, सख्खा मामाच आहे. किरकोळ वादातून चाकूने भोसकून मामाने आपल्या भाच्याला ठार मारलं. सिंहगड रोडवरील नऱ्हे परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. सिंहगड रोड पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी काकाला अटक केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Beed : मशिदीत जिलेटीनचा स्फोट, मध्यरात्री बीड जिल्हा हादरला, दोघे ताब्यात, घटना नेमकी काय?
गजाननच्या छातीवर केले चाकुने वार
गजानन गजकोश असं मुलाचं नाव असून, तो मुंबईतील धारावीचा रहिवासी आहे. या प्रकरणात मेधनाथ अशोक तपासे (41) यांला अटक करण्यात आली आहे. मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (31) यांनी याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार मंगेश ओव्हाळ हा आरोपी मेधनाथचा मेहुणाच आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन त्याचा मामा मेधनाथकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री गजाननचा मामाच्या मुलाशी वाद झाला. वादानंतर संतापलेल्या मेधनाथने भाचा गजाननला बेल्टने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने गजाननच्या छातीवर चाकूने वार केला.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
गजाननला या हल्ल्यात चाकूने भोसकल्यानं गंभीर जखमा झाल्या आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर गजाननला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच झोन 3 चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.
हे ही वाचा >> Nanded : व्हिडीओ कॉलवरुन विद्यार्थीनीचा विनयभंग, पिडितेच्या कुटुंबानं चोप दिल्यानंतर मुख्याध्यापकानं विष प्राशन...
दरम्यान, रात्री उशिरा आरोपी मेधनाथला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असं दिसून आले की, आरोपीने किरकोळ वादातून त्याच्या पुतण्याला चाकूने वार करून खून केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दैंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
