Sana Khan News : भाजप कार्यकर्ता सना खान हिची हत्या केल्याचं स्वतः अमित उर्फ पप्पू साहूने मान्य केलंय. पण, या प्रकरणात आता एक मोठा खुलासा त्याने केलाय. जबलपूरला सना जाणं हा अमित साहूने रचलेल्या कटाचा एक भाग होता, हेही पोलीस चौकशीतून समोर आलंय. पण, पप्पूने थंड डोक्याने सना खानचा खून का आणि कसा केला? हे अमित साहूच्या चौकशीनंतर उघड झालं आहे. (why amit shahu killed Bjp Worker sana Khan)
ADVERTISEMENT
जबलपूरला गेलेली सना खान 1 ऑगस्टपासून गायब होती. कुटूंबियांनी आरोप केला की खुन करुन सनाचा मृतदेह हिरण नदीत टाकलाय. इथे तक्रार केल्यानंतर पोलिसही बेपत्ता सनाचा शोध घेत होते. सनाच्या शोधासाठी पोलिसांनी जबलपूरच्या गोरा बाजारमधल्या पप्पूच्या फ्लॅटवरही शोध घेतला. कारण जबलपूरला आल्यानंतर गोराबाजारमध्येच सनाचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता.
अमित साहूवर बळावला संशय
पोलिसांनी सर्व प्रयत्न केले पण सना काही सापडली नव्हती. पप्पूच्या घरीही सना नव्हती. पप्पू मात्र गायब होता त्यावरुन पोलिसांना पप्पूवर संशय बळावला. सनाच्या भावानेही सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिल्याचा आरोप करत सनाची हत्या झाल्याच्या दिशेने तपास करण्याची मागणी केली होती.
वाचा >> महाराष्ट्रात ऑनर किलिंग! 16 वर्षाच्या लेकीची कोयत्याने हत्या, मृतदेह जाळला; कारण…
संशयाची सुई ज्या अमित उर्फ पप्पू भोवती फिरत होती, तो पप्पू काही पोलिसांना सापडत नव्हता. सना बेपत्ता झाल्यानंतर 10 दिवसांनंतर पप्पू पोलिसांना सापडला. 11 ऑगस्ट रोजी त्याला अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याने पोलिसांकडे सनाची हत्या केल्याची कबूली दिली.
सना खानची हत्या का करण्यात आली?
पैशावरून झालेल्या वादामुळेच सनाचा खून झाल्याचं उघड झालंय. पैसे द्यावे लागू नये म्हणून पप्पूने आधी सनाशी एप्रिलमध्ये लग्न केलं आणि ऑगस्टमध्ये थंड डोक्याने कट रचून खून केला. सना जबलपूरला जाणं आणि त्यानंतर तिचा खून होणं हा योगायोग नव्हता. पप्पूने सना जबलपूरला यावी यासाठी कट रचला होता.
वाचा >> लव्ह मॅरेज केलं, पण इंस्टाग्राममुळे झाला भयंकर शेवट, दोन लेकरांसमोरच पतीने…
सनाच्या मर्डरचा कट इथूनच सुरू होतो. सना खानने पप्पूच्या ढाब्यात 50 लाख रुपये गुंतवले होते. एप्रिलमध्ये 2023 मध्ये लग्नाच्या काही दिवस आधी सनाने पप्पूला सहा लाख रुपये आणि काही दागिने दिले होते. या सर्व पैशावरुनच वाद झाला होता.
सना खान-अमित शाहूमधील कसा वाढला?
सनाने अमितला दिलेली सोन्याची चेन त्याने विकली त्यातून मग वाद आणखीन चिघळला. कारण सना आता अमितकडे लग्नाच्या आधी दिलेले सहा लाख रुपये परत मागत होती. पण अमितला ते पैसे द्यायचे नव्हते. सनाच्या मर्डरआधी अमित उर्फ पप्पू साहूने आणि सना यांची भेट झाली होती. तेव्हाही त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. तेसुद्धा रस्त्यावरच.
पप्पू आणि सनामधले वाद वाढले होते. तसंच आता त्याला सनापासून स्वतःची सुटका करुन घ्यायची होती. म्हणूनच त्याने तिच्या हत्येचा कट रचला होता. सना जबलपूरला आली तर तिची हत्या करता येणार होती. म्हणून पैसे मागणाऱ्या सनाला व्हिडीओ कॉल करुन आधी पप्पूने शिवीगाळ केली. तिचा भरपू अपमान केला. ज्यामुळे सना भडकली. त्यानंतर तिने जबलपूरला जाण्याचा निर्णय घेतला. अमितला हेच हवं होतं.
वाचा >> Sharad Pawar Meets Ajit Pawar : पवार काका-पुतण्याची भेट वेगळ्याचं कारणासाठी
सना जबलपूरला आली तेव्हा अमितने तिचा खून करण्याचा प्लान आधीच केला होता. आता त्याच्या प्लाननुसार गोष्टी घडू लागल्या. अमितला भेटण्यासाठी सना पोहोचली जबलपूरला. ज्यावेळेस दोघांची भेट झाली त्या दिवशी सना आणि अमितमध्ये पैशावरुन वाद झाला. त्या वादाचा अंत म्हणजे अमितने सनाला दांड्याने मारलं. तिचा खून केला.
सना खानच्या हत्येसाठी कुणाची घेतली मदत?
गायब असलेला अमित उर्फ पप्पूला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्व ठिकाणी सापळा रचला होता. पप्पू मात्र गायब होता. पप्पूचं ठिकाण शोधण्यासाठी त्याच्या ढाब्यावरच्या कर्माचाऱ्यांचीही पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांना सुरुवातीपासून संशय होता की सनाची मर्डर झाली असेल तर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पप्पूने कोणाची तरी मदत घेतली असेल.
एकट्या पप्पूने सनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेली नाही या दिशेनेच पप्पूच्या साथीदाराचा शोध पोलिसांनी घेतला. यादृष्टीनेही ढाब्यावरील कर्माचाऱ्यांची चौकशी पोलिसांनी केली. त्यात पोलिसांना महत्त्वाचा क्लू सापडला होता. ढाब्यावर काम करणारा नोकर राजेश गौडने पोलिसांकडे पप्पूची गाडी धुतल्याची कबूली दिली. गाडीच्या डिक्कीमध्ये रक्ताचे डाग असल्याचंही राजेशने पोलिसांना सांगितलं. राजेश अनेक वर्षांपासून पप्पूसोबत होता. त्याला पप्पूचे अड्डे, येण्याजाण्याचे रस्ते आणि ठिकाणी तसंच बरंच काही माहित होतं.
राजेशने पोलिसांना काय सांगितलं?
राजेशने दिलेल्या कबूलीनंतर आता पोलिसांना पप्पूनेच खून केल्याची बाब स्पष्ट झाली होती. मात्र त्याची कबूली त्यांना आता पप्पूकडूनच मिळवायची होती. पप्पूचा शोध पोलिसांनी आणखीन जलद केला आणि पप्पू पोलिसांच्या तावडीत सापडला. पप्पूच्या अटकेनंतर पप्पूला पोलिस नागपूरला घेऊन गेले. पप्पूने सनाच्या खुनाची कबूली दिली. तसंच सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी हिरण नदीत सनाचा मृतदेह शोधला. 3 दिवसांनंतरही सनाचा मृतदेह पोलिसांच्या sdrf च्या टीमलाही सर्च ऑपरेशनमध्ये न थांबल्याने sdrf च्या टीमला सर्च थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अद्याप पोलिसांना सनाचा मृतदेह सापडलेला नाही. मागच्या तीन दिवसांपासून हिरा नदीत सर्च करणाऱ्या पोलिसांना सनाचा मृतदेह सापडला नाही. आता थांबवण्याचे आदेश देण्यात आलेत. पण पप्पूने सनाचा खून केल्याची कबूली दिल्याने पोलिसांना सनाचा खून झाल्याच्या दिशेने आता तपास सुरू केला आहे. अजून बरीच माहिती समोर यायचीय. सनाचा खून झाल्याचा सबळ पुरावा कोर्ट केसमध्ये पोलिसांना सादर करावा लागेल. त्यादिशेने पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे.
ADVERTISEMENT