Seventh standard girl four months pregnant: सातारा: सातारा (Satara) शहरातील सातवीत शिकणारी एक मुलगी चार महिन्याची गर्भवती (Pregnant) असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील सर्वात खळबळजनक गोष्ट म्हणजे संबंधित मुलीवर एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यानेच मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. सप्टेंबर 2022 मध्ये शाळकरी मुलाने गोड बोलून सातवी शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार (Rape) केला होता. ज्यानंतर आता मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे. ज्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. (satara 7th class girl four months pregnant raped by 9th class boy)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
नववीत शिकणाऱ्या एका मुलाची सातवीतील मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री जमली होती. त्यानंतर दोघांना एकमेकांबाबत प्रेम वाटून लागलं. त्यानंतर मुलाने मुलीशी अधिकच सलगी साधली आणि तिच्यावर तिच्याच घरी बलात्कार केला. दरम्यान, बलात्कारानंतरी मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना किंवा कोणालाही सांगितला नव्हता. पण त्यानंतर काही महिन्यांनी मुलीच्या मासिक पाळीबाबत तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांकडे तपासणी केली. ज्यामध्ये डॉक्टरांना काही गोष्टींबाबत शंका निर्माण झाली. ज्यानंतर डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना मुलीची सोनोग्राफी करण्या सांगितलं.
जेव्हा सोनोग्राफीचा रिपोर्टसमोर आला तेव्हा डॉक्टरांना देखील धक्का बसला. कारण अवघ्या 13 वर्षांची मुलगी ही तब्बल 4 महिन्यांची गरोदर असल्याचं सोनोग्राफी रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. जेव्हा डॉक्टरांनी ही बाब मुलींच्या पालकांना सांगितली तेव्हा ते देखील हबकून गेले. अखेर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन नेमकं काय घडलं याबाबत विचारणा केली. तेव्हा मुलीने घडलेला नेमका प्रकार समोर आला.
वाईमध्ये मामानेच केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार, पीडित मुलगी गरोदर राहिल्याने समोर आली घटना
नेमका प्रकार समजताच पीडित मुलीच्या आईने साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल केली. ज्यानंतर संबधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याची रवानगी रिमांड होममध्ये केली आहे. दुसरीकडे या घटनेतील संबधित मुलीला सध्या जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इंस्टाग्रामवर त्यांची मैत्री जमली होती.
पुणे : चुलत काकाचा अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ
या संपूर्ण घटनेने सातारा शहरात मात्र एकच खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेमुळे मात्र काही गंभीर सवालही उपस्थित झाले आहेत. तसेच पालकांनी देखील आपल्या मुलांबाबत अधिक सजग गरजेचं आहे.
ADVERTISEMENT