Pusesavali Satara : पुसेसावळीतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला तो कोण?

मुंबई तक

• 08:27 AM • 17 Sep 2023

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीमध्ये सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरुन दंगल घडली होती. त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्या दंगलीला कारणीभूत ठरलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध घेणे सुरु आहे.

Satara pusesawali riots crime criminal arrested

Satara pusesawali riots crime criminal arrested

follow google news

Satara Pusesavali : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आणि जाळपोळ झाली. यावेळी एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला करत पुसेसावळीत दंगल (Pusesawali Riots) घडवण्यात आली. या दंगलीत नूरहसन शिकलगार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुसेसावळीसह सातारा जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यावेळी सातारा पोलिसांकडून (Satara Police) शांततेचे आवाहन करण्यात आले. मात्र ज्या शिकलगार यांचा मृत्यू झाला, त्यानंतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींवर थेट कारवाई करत आधी 23 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतरही पोलिसांनी कारवाई चालूच ठेवत आतापर्यंत 37 जणांना अटक केली असून 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (pusesawali riot case in main mastermind satar police arrested)

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मुलीची छेडछाड… ओढणी ओढली अन् घडला अनर्थ ; भयानक व्हिडीओ व्हायरल

खुनाचा गुन्हा दाखल

साताऱ्यातील पुसेसावळी येथील आक्षेपार्ह पोस्ट वरून दोन समुहामध्ये जोरदार राडा झाला होता. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर पंधराहून अधिक लोकं जखमी झाली होती. त्यानंतर आता सातारा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांनावर कारवाई केली आहे. तर याच प्रकरणी 20 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Nandurbar News : धक्कादायक ! नंदुरबार सरकारी रुग्णालयात 179 बालकांचा मृत्यू, पालकांचा आक्रोश

दुसऱ्या आरोपीचा शोध

पुसेसावळी दंगल प्रकरणी खुनाचा गुन्हा त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल झाले असली तरी अन्य आरोपींवर नुकसान, जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुसेसावळी प्रकरणातील दोन प्रमुख सूत्रधारांपैकी काल राहुल कदम या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पुसेसावळी येथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुसेसावळीतील जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. तरीही पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा दिला असून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी पुसेसावळीतील मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    follow whatsapp