Crime News: तामिळनाडूतील तिरुनेलवेली (Tamil Nadu Tirunelveli) जिल्ह्यामध्ये दलित समुहातील (Dalit Community) दोन तरुणांवर हल्ला (Attack) करुन त्यांना विवस्त्र करुन मारहाण (beating) करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर लघवी करत त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
तुमची जात कोणती?
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ज्यांनी तरुणांना मारहाण केली आहे. ज्यांनी माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे ते दोघं तरुण 21 आणि 25 वर्षाचे आहेत. या दोघांनीही दारु पिऊन दोन तरुणांना मारहाण केल्याचेही पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या तरुणांनी पीडितग्रस्त युवकांना अडवून त्यांना तुमची जात कोणती असा सवाल केला होता.
हे ही वाचा >>Maratha Reservation : मराठा आंदोलनात केतकी चितळेची उडी, व्हिडिओ केला शेअर; म्हणाली…
दारु पिऊन केली मारहाण
थाचानाल्लूर पोलिसांनी सांगितले की, ज्यावेळी त्या दोन तरुणांना त्यांची जात विचारण्यात आली. त्यावेळी 6 तरुणांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण करत त्यांना निर्वस्त्रही करण्यात आले होते. त्यांनी त्या मुलांना निर्वस्त्र केल्यानंतर त्या सहा जणांनी त्यांच्या अंगावर लघवी केली. ज्या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली होती, ते दोघंही नदीतून अंघोळ करुन घरी परतत होते.
राज्यात खळबळ
या प्रकरणी पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा अन्याय करणाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून अन्याय करणाऱ्यां तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT