Mumbai Crime News In Marathi : दक्षिण मुंबईत एक सायबर क्राईमची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्सचे आमिष दाखविल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वृद्धाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूकही केली आहे. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत 39 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका वृद्धाने आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन कोणीतरी आपली 3.78 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाच्या फेसबुक अकाउंटवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. वृद्धाने ती रिक्वेस्ट स्वीकारली. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या. महिलेने फेसबुकवरून वृद्ध व्यक्तीला त्याचा मोबाईल नंबर विचारला.
हेही वाचा >> Khalistan movement : कॅनडा कसा बनला खलिस्तानवाद्यांचा बालेकिल्ला?
वृद्धाने नंबर दिल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. एफआयआरनुसार, कॉलरने वृद्धाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ तयार केला आणि तो वृद्धाच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला.
आरोपींनी धमक्या देऊन वृद्धांची केली फसवणूक
आरोपीने वृद्धाला धमकी दिली की, त्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू. या धमकीने वृद्ध व्यक्ती घाबरली आणि त्यांनी ब्लॅकमेलिंग करून मागितलेले 3.78 लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा पैसे मागितले. आरोपींकडून सातत्याने पैशाची मागणी केली जात असल्याने कंटाळून वृद्ध व्यक्तीने दक्षिण मुंबईतील डीबी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस पोहोचले भरतपूरला
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल नंबर ट्रॅक केला असता, तो राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?
यानंतर मुंबई पोलिसांचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने 16 सप्टेंबर रोजी आरोपीच्या मूळ गावी बामणी येथे पोहोचले आणि त्याला अटक केली. आऱोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींचा मुंबई पोलिसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला.
ADVERTISEMENT