Kalyan Suicide: 'तुझे ओठ काळे, तुझ्या तोंडातून वास येतो', पती-सासूच्या टोमणे; विवाहितेची आत्महत्या

मिथिलेश गुप्ता

10 Jul 2024 (अपडेटेड: 10 Jul 2024, 08:40 PM)

Kalyan Suicide Case: पती आणि सासूकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कल्याण ग्रामीणमध्ये घडली आहे.

पती-सासूच्या टोमणे; विवाहितेची आत्महत्या

पती-सासूच्या टोमणे; विवाहितेची आत्महत्या

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमधील 24 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

point

सासू आणि पतीच्या त्रासाला वैतागून आत्महत्या

point

मोबाइलवर लिहिली सुसाइड नोट

Kalyan Suicide Case: डोंबिवली: कल्याणमधील आडीवली-ढोकळी भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जागृती बारी (वय 24 वर्ष) नावाच्या एका नवविवाहित महिलेने पती आणि सासूच्या रोजच्या टोमण्यांना वैतागून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर पत्नी जागृतीच्या पार्थिवाला अग्नी द्यायला तिच्या नवऱ्याने चक्क नकार दिला. त्यामुळे तिचा भाऊ विशाल वराडे याने बहिणीवर अंत्यसंस्कार केले. (shocking incident in kalyan rural married woman commits suicide due to teasing by husband and mother in law)

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

आत्महत्येपूर्वी जागृतीने मोबाइलमध्ये सुसाइड नोट लिहून तिची सासू आणि पतीला जबाबदार धरलं आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सागर रामलाल बारी (वय 32 वर्ष) असे अटक केलेल्या पतीचं नाव आहे. शोभा रामलाल बारी असे अटक केलेल्या सासूच नाव आहे. दरम्यान 11 जुलैपर्यंत या दोघाना न्यालयाने पोलीस कोठडी सुनवली असून सागर हा मुंबईच्या आजाद नगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा>> Crime: नगरसेवकाला बाथरुममध्ये बोलावलं अन् गुप्तांगच कापून टाकलं

जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे देखील सांगितल.. आईने सांगितले की  ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस, तुझे ओठ काळे आहेत. तुझ्या तोंडाचा घाण वास येतो असे हिणवून तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असं जागृतीने आपल्या आईला फोनद्वारे सांगितले असल्याचे जागृतीच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे. 

हे ही वाचा>> संशयाच भूत डोक्यात शिरलं, लोखंडी रॉडने पत्नीला संपवलं; नेमकं काय घडलं?

दरम्यान, या संपूर्ण घटनेने जागृतीच्या कुटुंबीयांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. आपल्या तरुणी मुलीला अशा पद्धतीने गमावल्याने तिच्या माहेरकडील कुटुंबीयांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    follow whatsapp