Badlapur school case: बदलापूर: बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असल्याचं कालपासून पाहायला मिळत आहे. या घटनेबाबत संताप व्यक्त करत काल (20 ऑगस्ट) नागरिकांनी 9 तास रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना हटवलं होतं. पण अद्यापही या घटनेबाबतचा राग हा नागरिकांमध्ये प्रचंड आहे. ज्याचा उद्रेक आज (21 ऑगस्ट) पुन्हा एकदा झाला असल्याचं पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT
अवघ्या काही वेळापूर्वी काही संतप्त नागरिकांनी आरोपी अक्षय शिंदे याची बदलापूरमधील घरात घुसून सामानाची तोडफोड केली. ज्यामध्ये त्याच्या घरातील सर्व सामान फोडण्यात आलं. याच घटनेची माहिती मिळताच मुंबई Tak च्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नेमकी घटना काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
हे ही वाचा>> Badlapur News: 'तिने आई-बापाची शपथ घेऊन सांगायचं...', वामन म्हात्रे म्हणतात मी तसं बोललोच नाही!
दरम्यान, याचवेळी आरोपी अक्षय शिंदे याच्या शेजाऱ्यांनी त्याच्याविषयी काही धक्कादायक माहिती दिली.
अक्षय शिंदेच्या शेजाऱ्यांनी दिली नवी माहिती
काही वेळापूर्वीच आरोपी अक्षय शिंदे याच्या घराची संपूर्ण तोडफोड केली. अक्षय शिंदेंचा नेमका पत्ता समजल्यानंतर बदलापूरमधील काही संतप्त नागरिकांनी त्याच घर गाठून तिथे तोडफोड करत घरातील सगळ्या सामानाची नासधूस केली. आता हे घर बंद असून त्याला टाळं लावण्यात आलं आहे.
दरम्यान, मुंबई Tak च्या टीमने घटनास्थळी जाऊन या घटनेचा आढावा घेतला तेव्हा आरोपी अक्षय शिंदेच्या काही नातेवाईकांनी अशी माहिती दिली की, आरोपी अक्षय शिंदे याचं पहिलं एक लग्न झालं होतं. पण त्याची बायको त्याला सोडून गेली होती.
हे ही वाचा>> Badlapur: 'तुझा रेप झालाय का?, की तू बातमी करतेस...', ही आहे 'त्या' संपूर्ण प्रकरणाची Inside स्टोरी
त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं होतं. जवळजवळ 4-5 महिन्यांपूर्वीच त्याचं हे दुसरं लग्न झालं होतं. आता ज्या घरात तोडफोड झाली तिथे आरोपी अक्षयची बायको, आई, त्याचा मोठा भाऊ आणि त्याची पत्नी असं संपूर्ण कुटुंब राहत होतं.
दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड झाल्याची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची नोंद करुन घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी अक्षय शिंदे याने बदलापूरमधील एका शाळेतील दोन 4 वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण या घटनेची तक्रार घेण्यास बदलापूर पोलिसांनी तब्बल 12 तास लावले होते. ज्यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोपी आणि पोलिसांविरोधात उद्रेक झाला. सुरुवातीला आंदोलकांनी थेट शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. तर त्यानंतर दुसरीकडे बदलापूर स्थानकावरील रेल्वे ट्रॅकवर उतरून तब्बल 9 तास आंदोलन केलं होतं.
आरोपीला तात्काळ फाशी द्या ही मागणी करत आंदोलकांनी 9 तास रेल्वे मार्ग रोखून धरला होता. या दरम्यान, अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. अखेर पोलिसांना लाठीहल्ला करत आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.
ADVERTISEMENT