Manipur News: गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमधील सामाजिक वातावरण प्रचंड तणावात असल्याचे दिसून येत आहे. नुकताच मणिपूरमधील कुकी समाजातील एका युवकाला जाळल्याचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फ्रंट (ITLF) चे प्रवक्ते गिंजा यांनी सांगितले की, हा व्हिडीओ मे महिन्यातील असून सध्या तो व्हायरल करण्यात आला असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ 7 सेकंदाचा असून त्यामध्ये एक तरुण जळताना दिसत आहे. तर त्याच्या बाजूला काही लोकांचे पाय दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
मंत्र्याच्या घरासमोरही स्फोट
या व्हिडीओबद्दल मणिपूरचे डीजीपी राजीव सिंग यांनी सांगितले की, काही वेळापूर्वी हा व्हिडीओ आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे त्याची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तर मणिपूरमधील दुसऱ्या एका घटनेत इंफाळामध्ये शनिवारी सिंगजामेईमधील ग्रामविकास मंत्री वाय. खेमचंद यांच्या निवास्थानासमोर स्फोट झाला आहे. तर त्या स्फोटात सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
हे ही वाचा >> जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला भर रस्त्यातच जाळून ठार मारलं
विद्यार्थ्यांच्या कत्तली
मणिपूरमधील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची छायाचित्रे 23 सप्टेंबर रोजी समोर आली होती. त्या छायाचित्रांमध्ये दोन्ही मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याचे मुंडकेही छाटण्यात आले होते. मात्र, दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेहही अद्याप सापडलेले नाहीत. त्या घटनेमुळेच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला होता. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या मागणीसाठी निदर्शने केल्यानंतर मोठा हिंसाचार घडला होता.
सीबीआय कोठडी
मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने 1 ऑक्टोबर रोजी दोन महिलांसह 4 जणांना अटक केली होती. तो चुरचंदपूरमधून ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं पाओमिनलून हाओकीप, एस. मालसावम हाओकीप, लिंगनीचॉन बाइट आणि टिनपिंग आहे. तपास यंत्रणेने सर्व आरोपींना आसाममधील गुवाहाटी येथे ठेवले असून त्याना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा >> Weapons of Hamas: ‘हमास’कडे असं काय आहे ज्याने Israel केलं सळो की पळो?
अल्पवयीन मुलीही ताब्यात
अटक करण्यात आलेल्यांमध्ये खुनाचा आरोप असलेला मुख्य आरोपी आणि त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. या दोघांच्या मुली अल्पवयीन असल्याने सीबीआयने त्यांनाही ताब्यात घेतले आहे. मुलींच्या काळजी घेण्यासाठी नातेवाईकांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT