Bhagyashree Mote: रुम शोधायला गेली अन् मृत्यू; भाग्यश्रीच्या बहिणीसोबत काय झालं?

मुंबई तक

13 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

Marathi actress Bhagyashree mote’s sisters Death : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा पुण्यातील वाकड भागात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मधु मार्कन्डेय (Madhu Markandey) असं तिच्या बहिणीचं नाव असून तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. अधिक माहिती अशी की, मधु एक बेकर होती. आपला व्यवसाय वाढवण्याच्यादृष्टीने ती […]

Mumbaitak
follow google news

Marathi actress Bhagyashree mote’s sisters Death : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा पुण्यातील वाकड भागात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मधु मार्कन्डेय (Madhu Markandey) असं तिच्या बहिणीचं नाव असून तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. अधिक माहिती अशी की, मधु एक बेकर होती. आपला व्यवसाय वाढवण्याच्यादृष्टीने ती रविवारी भाड्याने रूम पाहायला बाहेर पडली होती. (Suspicious death of actress Bhagyashree Mote’s sister)

हे वाचलं का?

कुटुंबियांना घातपातचा संशय

अशी माहिती मिळतेय की, यादरम्यान तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. तिच्या मैत्रिणीने तिला रुग्णालयात नेलं, मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. मधुच्या कुटुंबियांना याबाबत संशय आहे. त्यांना मधुसोबत घातपात झाल्याचा संशय आहे. तर मधुचा अचानक मृत्यू झाला असावा, असं प्राथमिकदृष्ट्या पोलिसांना वाटतं.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने म्हणाले, मधू मार्कंडेय केक बनवण्याचा व्यवसाय करीत होती. रविवारी ती आपल्या मैत्रिणीसह रूम पाहायला निघाली होती. याचदरम्यान तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. तिच्या मैत्रिणीने तात्काळ तिला खासगी रुग्णालयात नेलं. तिथे तिला यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात जायला सांगितलं. तिथेच तिला मृत घोषित करण्यात आलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Satish Kaushik Death: 15 कोटी रुपयांसाठी झाली सतीश कौशिकची हत्या?

भाग्यश्रीने बहिणीसाठी केली पोस्ट

अभिनेत्री भाग्यश्रीने आपल्या बहिणीच्या आठवणीत इंस्टाग्रामवर काही भावुक पोस्ट केल्या आहेत. तिने लिहलंय की तुझ्याविना माझं आयुष्य काहीच नाही. तू माझ्यासाठी काय होतीस, हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. तू नसलेल्या या आयुष्यात मी काय करू? असं भाग्यश्रीने लिहलंय. यादरम्यान ती खूपच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. आता पोलीस तपासात मधुच्या मृत्यूबद्दल काय समोर येतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

किर्ती मोटे हत्याकांड : अभिनेत्रीची मन सुन्न करणारी पोस्ट! ‘आई तू आमच्या मागे ठाम होतीस म्हणून…’

    follow whatsapp