Titwala Railway Station Rape Case: टिटवाळा: कल्याणनजीक टिटवाळा (Titwala) रेल्वे स्थानकाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला प्रवासी लोकलने उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत असलेल्या शेजारील झुडपात नेऊन महिलेवर जबरी अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम आरोपी निशांत चव्हाण याला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे टिटवाळा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (titwala crime a woman who was returning home from the railway track was raped by a lustful accused)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
सोमवारी (13 नोव्हेंबर) संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली. पीडित महिला ही शहाड येथे एका खाजगी कंपनीत काम करते. टिटवाळा रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ही महिला शेजारीच असलेल्या रेल्वे ट्रॅकवरून चालत-चालत आपल्या घराकडे जात होती. यावेळी एक इसम तिचा पाठलाग करत होता. पण पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत असल्याने आपला कोणीतरी पाठलाग करतंय याचा तिला अंदाज आला नाही.
हे ही वाचा>> Nana Patekar : ‘चूक झाली माफ करा पण…’, टपली मारलेल्या Video वर पाटेकर अखेर बोलले!
याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी निशांत चव्हाण याने महिलेला जबरदस्तीने खेचत रुळालगत असलेल्या झाडाझुडपात नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. बलात्कारानंतर आरोपी निशांतने या घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारू अशी धमकीही दिली. घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला
त्यानंतर पतीने त्या परिसरातील काही नागरिकांशी फोनवर संपर्क साधला. ज्यामुळे तात्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केलं. निशांत चव्हाण असे या नराधमाचं नाव असून त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Crime : 16 वर्षाच्या मुलाने 22 वर्षांच्या गर्लफ्रेंडची केली हत्या, ठाण्यात नेमकं काय घडलं?
निशांत हा पडघा येथे एका खाजगी कंपनीत काम करतो. याप्रकरणी एसीपी मनोज पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT