उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) बांदामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरूणाचे अडीच महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. नरेंद्र असे या तरूणाचे नाव आहे. नरेंद्रच्या निधनाने आता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या प्रकरणात बायको (Wife) माहेरी गेल्याने तरूणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. पण आता तरूणाच्य़ा आत्महत्येमागचं हेच कारण आहे की आणखीण काही हे जाणून घेऊयात. (two and half month of marriage husband commited suicide wife leave home banda uttar pradesh story)
ADVERTISEMENT
बाबेरू कोतवालीच्या राघव ठोक परिसरात राहणाऱ्या छोटेलाल यांचा मुलगा नरेंद्रचे अडीच महिन्यापूर्वी चित्रकुट जिल्ह्यातील तरूणीसोबत लग्न झाले होते. या लग्नानंतर तरूणाचे कुटुंबियांसोबत वाद झाले होते. ज्यामुळे तरूणाने बायकोसह वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. नरेंद्र हा नेशच्या आहारी गेला होता. त्यामुळे पैशासाठी नरेंद्रने बायकोचे दागिने देखील विकायला काढले होते. मात्र बायकोने त्याला विरोध केल्यास तो तिच्याशी भांडायला लागला. यानंतर एके दिवशी नरेंद्र त्याच्या बायकोसोबत मंदिरात गेला होता, यावेळी कोणत्यातरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि नरेंद्रने तिला सर्वांसमोर मंदिरातच मारहाण करायला सुरूवात केली होती.
हे ही वाचा : Rape Case: ‘तुझ्या भावाचा अपघात झालाय’, मामाच्या मुलाकडून तरुणीचा घात, 4 दिवस गँगरेप
नरेंद्रच्या या मारहाणीमुळे बायको खुपच रागावली आणि माहेरी निघून गेली. यावेळी नरेंद्रने तिला फोन करून परत येण्यास सांगितले होते. पण पत्नीने घरी परत येण्यास नकार दिला होता. बायकोच्या या नकाराने नाराज होऊन नरेंद्र घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांतील एका व्यक्तीने घरात प्रवेश करताच त्याला धक्का बसला आणि ही घटना उघडकीस आली.
कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून नरेंद्रचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून नरेंद्रच्या मृत्यूचे काय कारण समोर येते? त्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे.
या प्रकरणावर डिएसपी राकेश कुमार सिंह म्हणाले की, सुरुवातीला कुटुंबातील वादामुळे तरूणाने आत्महत्या केल्याचा संशय होता. सध्या आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत, आता रिपोर्टमधून काय अहवाल समोर येतो, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
ADVERTISEMENT