Two brother deadl Attack On Virar : दोन सख्ख्या भावांवरील प्राणघातक हल्ल्याने विरार (Virar) शहर हादरल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलीय. तर दुसरा भाऊ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून हा वाद झाला होता.या वादातून ही घटना घडलीय. या घटनेत पोलिसांनी (virar police) दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक जण फरार आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. (two brothers deadly attack in virar husband injured and brother death)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
विरार Virar) पूर्वेत दत्तात्रेय शिंदे त्यांच्या पत्नी आणि भाऊ सचिन शिंदे सोबत राहतात. दत्तात्रय शिंदे यांना त्यांच्य़ा पत्नीसोबत एक तरूण फोनवर बोलत असल्याचा संशय होता.या संशयातून दत्तात्रय शिंदे यांनी संबंधित नंबरवर कॉल करून त्याला साईनाथ नगर नाक्यावर भेटण्यास बोलावले होते. यावेळी घटनास्थळी पोहोचताच दत्तात्रय शिंदे यांनी तरूणाला ‘माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोय’ असा जाब विचारला होता. या दरम्यान चौघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून आरोपी राहुल शिंदे याने दत्तात्रेय शिंदे यांचा लहान भाऊ सचिन शिंदे याच्या पोटात चाकूने वार करून हल्ला केला. आणि दत्तात्रेय शिंदे यांच्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोघांना खाजगी रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारा दरम्यान सचिनचा मृत्यू झाला, तर दत्तात्रय यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा : तीन हजार दिले नाही म्हणून ‘आयटी’तील तरुणाचा घेतला जीव
याप्रकरणी दत्तात्रय शिंदे यांनी विरार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यानंतप पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या घटनेत एक आऱोपी फरार झाला आहे, त्याचा पोलिस शोध घेत आहे. तसेच या घटनेत नेमकी हत्या संशयावरून करण्यात आली आहे की वादामुळे हत्याकांड झालंय, याचा पोलीस तपास करतायत.
या घटनेतील तक्रारीनुसार हत्येमागचं कारण संशय असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या तपासात अद्याप असे निष्पण्ण झाले नाही आहे. तसेच अद्याप तपास सूरू असून हत्येचे निश्चित कारण सांगता येणार नाही, अशे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT