Double Murder : राजस्थानमधील उदयपूरमध्ये अंबामाता येथील कॉलनीतील एका घरात भरदिवसा दोन वृद्ध महिलांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही हत्या दरोड्या (robbery) टाकण्याच्या उद्देशाने केली असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या करण्यात आलेल्या दोन मृत महिला या सख्ख्या बहिणी (sisters) असल्याचेही सांगण्यात येत आहे. बोहरा समाजातील या दोन बहिणी त्या त्यांच्या घरात एकट्याच राहत होत्या.
ADVERTISEMENT
डोक्यावर खोलवर जखमा
दोघी बहिणींच्या घरातील सुरक्षारक्षक दसऱ्याच्या सुट्टीनंतर ज्यावेळी घरी पोहचला. त्यावेळी त्यांना दोन वृद्ध बहिणींची हत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्या दोघीही वृद्ध महिलांच्या डोक्यावर खोलवर जखमा झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.
दोघी बहिणी एकाच घरात
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नवरत्न कॉम्प्लेक्सच्या डायमंड कॉलनीतील रहिवासी याह्या अली यांची पत्नी हुसैना ( वय 80) या घरात एकट्याच राहत होत्या, तर त्यांची बहीण सारा ( वय 75) ही हातीपोल परिसरात राहतात. हुसैनाचा मुलगा दिल्लीत राहतो, त्यामुळे या दोन्ही बहिणी अनेकदा एकत्र राहत होत्या.
हे ही वाचा >> Chandra Grahan 2023: चंद्र ग्रहणाचा सुतक काळ सुरु, पुढचे 9 तास अजिबात करू नका ‘या’ चुका!
तळमजल्याला लागली आग
नवरात्रौत्सवानिमित्त त्यांचा सुरक्षारक्षक आपल्या घरी गेला होता. त्यामुळे दोघी बहिणी घरी एकट्याच होत्या. सुट्टीनंतर वॉचमन घरी आला तेव्हा, घराच्या तळमजल्यातील कार्पेटला आग लागून त्यातून धूर निघत होता. त्यामुळे वॉचमनने त्या दोघी बहिणींना हाक मारली मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने त्यांच्या घरात जाऊन पाहिले असता. त्या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या.
सुरक्षारक्षकाचीही तपासणी
दोन्ही सख्ख्या बहिणींची दरोडा टाकण्यासाठीच हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता घराच्या सुरक्षारक्षकापासून ते परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी पोलीस करत आहेत. तसेच दोन्ही महिला घरी असताना त्यांच्याकडे कोणी येऊन गेले आहे का त्याचाही तपास पोलीस करत आहेत. सुरक्षारक्षक सुट्टीवर गेल्यानंतर त्या दोघी एकट्याच घरी असल्याची माहिती चोरट्यांना असल्यामुळेच ही हत्या करण्यात आली आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT