Kolhapur Crime: भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने जेवणात कालवलं विष अन्... असं केलं तरी का?

भाचीनं मर्जीविरोधात विवाह केल्यामुळं संतापलेल्या मामानं जेवणाच्या भांड्यात विषारी द्रव्य मिसळून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे.

भाचीच्या लग्नात मामाने जेवणात कालवलं विष

भाचीच्या लग्नात मामाने जेवणात कालवलं विष

मुंबई तक

• 09:20 PM • 08 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाचीच्या लग्नाचं रिसेप्शन, मामाने केला घातपाताचा प्रयत्न

point

भाचीने मामाच्या मर्जीविरुद्ध केलं लग्न

point

मामाने जेवणात विषारी द्रव्य मिसळलं

कोल्हापूर: भाचीनं मनाविरूध्द लग्न केल्यामुळं संतापलेल्या मामानं लग्नानिमित्त आयोजित रिसेप्शनच्या जेवणात विषारी द्रव्य मिसळल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये समोर आलं आहे. सुदैवानं जेवणाच्या भांड्यात विषारी द्रव्य टाकताना, काही व्यक्तींनी बघितलं आणि तातडीनं जेवणाची भांडी बाजूला ठेवून पुन्हा नव्याने जेवण बनवलं. त्यामुळं मोठी जीवितहानी टळली आहे. (uncle mixed poison in food bowl because niece married against her will shocking incident in kolhapur)

हे वाचलं का?

पन्हाळा तालुक्यातील उत्रे गांव इथं घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळं एकचं खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची आता पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे गांव इथं रहाणाऱ्या एका युवतीनं आपल्या पसंतीच्या युवकाशी पंधरा दिवसापूर्वी विवाह केला होता. विवाह सोहळ्याला दोन्ही घरची मान्यताही होती. मात्र, आपल्या मर्जीविरोधात भाचीनं लग्न केल्यामुळं मामा चांगलाच चिडला होता.

हे ही वाचा>> Sambhajinagar Honour Killing : जातीबाहेरच्या मुलाशी प्रेमसंबंध, भावाने बहिणीला थेट दरीत ढकललं, क्रिकेट खेळणाऱ्या पोरांमुळे घटना उघड

दरम्यान, लग्नानिमित्त उत्रे गावात पाहुण्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. गावाशेजारील एका मंडपात जेवण बनवलं जात होतं. दरम्यान वधूच्या मामानं तयार जेवणाच्या भांड्यामध्ये विषारी द्रव्य मिसळलं. सुदैवानं ही बाब काही लोकांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीनं विषारी द्रव्य मिसळलेली जेवणाची भांडी बाजूला नेली आणि नवीन जेवण तयार करून, पाहुण्यांना वाढण्यात आलं. 

मात्र, या धक्कादायक प्रकारानं लग्न मंडपात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकाराची माहिती पन्हाळा पोलीसांना मिळताच पन्हाळा पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

हे ही वाचा>> Beed News : बीड पुन्हा हादरलं! पोलीस मुख्यालयातच पोलिसाची आत्महत्या, नेमकं कारण काय?

अन्नाचे नमुने पाठवले फॉरेन्सिक लॅबमध्ये 

दरम्यान या घटनेबाबत पोलीस अधिकारी म्हणाले की, 'आम्ही कलम 286 (विषारी पदार्थाच्या बाबतीत निष्काळजीपणाचे वर्तन), 125 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणणारे कृत्य) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे . त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या अन्नात विषारी पदार्थ मिसळले होते ते कोणीही खाल्ले नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

    follow whatsapp