Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशाच्या कौशांबी (Kaushambi) जिल्ह्यातील एकाच्या हत्या (Murder) प्रकरणाचा पोलिसांनी नाट्यमयरित्या खुलासा केला आहे. हत्येचा तपास करणारे पोलीस गावातून निघून गेल्यावर गावातीलच माणूस मृत व्यक्तीचे चप्पल घालून बाहेर फिरत होता. त्यावेळी मृताचे चप्पल (slippers) पाहिल्यावर मात्र अनेक लोकांना धक्का बसला. त्यांनंतर लोकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी या हत्येचा तपास अगदी नाट्यमयरित्या लावला आहे.
ADVERTISEMENT
किरकोळ कारणावरुन वाद
पूर्ववैमनस्यातून तिघांनी मिळून कुऱ्हाडीने हल्ला (Attack) करुन मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सराई अकिल पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना 20 सप्टेंबर रोजी घडली होती. टप्पा गावाजवळ मृत मोहनलाल यांच्या वडिलांनी त्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. त्यावेळी ते म्हणाले की, माझा मुलगा आणि माझी सून गडिया देवी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर मोहनलाल लाकूड गोळा करण्यासाठी गेला तो पुन्हा घरी आलाच नाही. मात्र दुसऱ्या दिवशी मोहनचा मृतदेहच एका कोरड्या तलावात आढळून आला.
हे ही वाचा >> शुभमन गिलच्या आजाराने वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन; बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
एका चुकीने केलं उघड
मोहनलाला यांच्या हत्येनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले. मात्र त्यांच्याकडून विशेष काही माहिती मिळाली नव्हती. मात्र त्याच वेळी इस्लाम नावाच्या व्यक्तीने एक चूक केली आणि हत्येचा सगळा उलघडा झाला.
मृताचे चप्पलने लागला छडा
मोहनलाल यांची हत्या झाल्यानंतर काह दिवसांनी इस्लाम मोहनलाल यांचे चप्पल घालून गावात फिरत होता. त्यावेळी गावातील लोकांनी त्याच्या पायाकडे बघून आश्चर्य व्यक्त केले होते. इस्लामची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही त्याला तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हे ही वाचा >> Dombivli Crime : सात मुली अन् घरातच देह व्यापार; सेक्स रॅकेटवर पोलिसांची मोठी कारवाई
कुऱ्हाडीचे घाव
पोलिसांनी इस्लामला ताब्यात घेतल्यानंतर सांगितले की, इस्लाम, हबीबुर रहमान आणि दिनेश या सर्वांनी मिळून जुन्यावादातून मोहनलालची हत्या केली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हाही दाखल केला. या तिघांनी मिळून पूर्व वैमनस्यातून मोहनलालचा कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. या संशयितांना आता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT