Santosh Deshmukh Murder Case: आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी! केज कोर्टात नेमकं काय घडलं?

Santosh Deshmukh Murder Case Latest Update: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने (SIT) सहा आरोपींना अटक केलीय.

Santosh Deshmukh Murder Case

Santosh Deshmukh Murder Case

मुंबई तक

• 08:32 PM • 10 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

point

विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

point

वकिलांनी दिली महत्त्वाची माहिती

Santosh Deshmukh Murder Case Latest Update: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सीआयडीने (SIT) सहा आरोपींना अटक केलीय. यापैकी आरोपी विष्णू चाटेला आज केजच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. यावेळी सुनावणी दरम्यान न्यायालयाने विष्णे चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयात सीआयडीने नवीन खुलासे उघड केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

विष्णू चाटेचे वकील माध्यमांशी बोलताना काय म्हणाले? 

"रिमांड यादीत त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केली होती. विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे. आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयात पोलीस प्रशासनासमोर जी रिमांड यादी दाखल करण्यात आली, त्या रिमांड यादीत त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केली होती. त्यांनी केलेली मागणी, न्यालयात आलेले कागदपत्र हे सर्व पाहून न्यायालयाने आरोपी विष्णू चाटे यांना 14 दिवसांच्या मॅजिस्ट्रेट कस्टडीत पाठवलं आहे. या 14 दिवसानंतर पुन्हा ती 14 दिवस वाढली जाते. आरोपी जामीनाचा अर्ज दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे. परंतु, आम्ही आज तशी कोणतीही प्रक्रिया केलेली नाही".

हे ही वाचा >> Jitendra Awhad: "कलेक्टरची, एसपीची पहिली चौकशी सुरु करा...", परळी विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेवरून जितेंद्र आव्हाड संतापले

आरोपीच्या वकीलांनी स्पष्ट केलंय की, आम्ही कोणत्याही प्रकारचा जामीनाचा अर्ज केला नाही किंवा जामीन मागितला नाही. खंडणी प्रकरणी विष्णू चाटे यांना न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली आहे. एसआयटी, सीआयडीचे अधिकारी, एसआयटीचे बसवराव तेली तपास करत आहेत. एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. परंतु, अधिकाऱ्यांकडून  गुप्तता पाळण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही पथकाचे अधिकारी तळ ठोकून आहेत. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : "ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना...", उद्धव ठाकरे कडाडले, बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण

    follow whatsapp