Sharad Mohol हत्येमागे भलताच म्होरक्या, आतापर्यंतची सर्वात खळबळजनक अटक!

मुंबई तक

• 12:54 PM • 15 Jan 2024

Sharad Mohol Murder: शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपी गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ माजली आहे. वेगळ्या गँगमधील या दोन्ही गुंडांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध समोर आलं आहे.

vitthal shelar and ramdas marne main accused in sharad mohol murder case were arrested in a raid at farmhouse in panvel

vitthal shelar and ramdas marne main accused in sharad mohol murder case were arrested in a raid at farmhouse in panvel

follow google news

Sharad Mohol Murder Vitthal Shelar and Ramdas Marne arrest: पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्येने अवघं शहर हादरून गेलं होतं. सुरुवातीला ही हत्या मोहोळ गँगमधील अंतर्गत कलहातूनच झाल्याची चर्चा होती. मात्र, आता या हत्या प्रकरणातील वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. आतापर्यंत मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात होतं. पण आता पुण्यातील वेगळ्याच टोळीच्या म्होरक्याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे आता या प्रकरणातील गूढ अधिक वाढलं आहे. रविवारी पहाटे पनवेल पोलिसांनी पुण्यातीलच कुख्यात गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास उर्फ वाघ्या मारणे यांना मोहोळ हत्या प्रकरणात अटक केली आहे. (vitthal shelar and ramdas marne main accused in sharad mohol murder case were arrested in a raid at farmhouse in panvel)

हे वाचलं का?

पुण्यात पुन्हा टोळी युद्ध?

या दोन्ही आरोपींच्या अटकेनंतर पुण्यातील अंडरवर्ल्डमध्ये खळबळ माजली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळचा साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर याने ही हत्या केल्यानंतर तोच मुख्य आरोपी असावा असा पुणे पोलिसांचा अंदाज होता. मात्र, त्याच्या अटकेनंतर चौकशीतून जी माहिती समोर आली त्या आधारे पोलिसांनी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे यांना अटक केली. हेच दोघे शरद मोहोळच्या हत्येतील मुख्य आरोपी असल्याची नवी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा>> Sharad Mohol: ‘मुळशी पॅटर्न’ ज्यावरुन आला त्या ‘मोहोळ गँग’चा रक्तरंजित इतिहास! A टू Z स्टोरी…

पनवेल पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास पनवेलमधील एका फार्म हाऊसवर धाड टाकून या दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली. तसेच वाशीमधून देखील इतर काही आरोपींना अटक केली आहे.

शरद मोहोळच्या हत्येनंतर सर्वात आधी मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. पण या प्रकरणात एवढेच आरोपी नसल्याची जाणीव पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ सखोल चौकशीला सुरुवात केली. दुसरीकडे शरद मोहोळच्या हत्येनंतर इतर आरोपी हे पनवेल आणि वाशी भागत लपले होते. याबाबतची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा पोलिसांनी तात्काळ छापे टाकून या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

मोहोळ हत्येचे कराड कनेक्शन!

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी कराड कनेक्शन देखील समोर आलं होतं. या गुन्ह्यात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. यामधे मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले.

हे ही वाचा>> Crime : नवी मुंबई हादरलं! बिल्डराला कार्यालयात घुसून संपवलं, नेमकं काय घडलं?

पुणे पोलिसांनी कराडतील धनंजय वटकर (राहणार कराड) या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केले होते. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने काही महत्वाची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.

    follow whatsapp