उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) पीलीभीतमधून (pilibhit) एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका व्यक्तीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कालव्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव 55 वर्षीय रामपाल असे आहे. पोलिसांनी या प्रकरणात मृत व्यक्तीच्या मृतदेहाच्या तुकड्यांचा कालव्यात शोध सुरू केला आहे. यासोबत या हत्येचा तपास सुरु केला आहे.(wife murdered husband cut pieces and dumped dead body in canal pilibhit uttar pradesh crime story)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
गजरोला पोलीस ठाणे हद्दीतील शिवनगर गावात राहणारे रामपाल मंगळवारी सकाळपासून बेपत्ता झाले होते.रामपाल हे घरात एकटेच राहायचे, तर त्यांचा मुलगा सोमपाल हा पत्नी आणि मुलांसह गावातीलच दुसऱ्या घरात राहायचा.त्या दिवशी बुधवारी आई दुलारो देवीने सोमपालला वडील रामपाल घरातून बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार सोमपालने गावात रामपाल यांचा शोध घेतला, मात्र त्याला काय वडील सापडले नाही. त्यामुळे त्याने अखेर पोलीस ठाणे गाठून वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला.
हे ही वाचा : गळा आवळून हत्या केली, नंतर कपडे उतरवून…; भावाने बहिणीसोबत केलेल्या कृत्याने सगळेच हादरले
सोमपालने वडील बेपत्ता झाल्याच्या तक्रारीत पोलिसांना एक महत्वपूर्ण माहिती दिली.त्याने पोलिसांना सांगितले की, वडील आणि आईमध्ये नेहमीच वाद व्हायचे. या वादातून आई घर सोडून गेली होती.आता काहीच दिवसांपूर्वी ती घरी आली आहे.मुलगा सोमपालने दिलेल्या या माहितीवरून पोलिसांना दुलारो देवीवर संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी दुपारी दुलारो देवीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली.यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच दुलारो देवीने हत्येची कबूली देत घटनेची उकल केली.
दुलारा देवीने पोलिसांना सांगितले की, रविवारी रात्री रामपाल झोपले असताना त्यांना पलंगाला बांधले आणि कुऱ्हाडीने त्यांची निर्घृण हत्या करून शरीराचे तुकडे तुकडे केले.यानंतर हे तुकडे गावातील कालव्यात फेकून दिल्याची माहिती तिने दिली.त्यानुसार पोलिसांनी कालव्यात मृतदेहाचा शोध सुरू केला होता. मात्र पोलिसांना शरीराचे तुकडे सापडले नाहीत. पण रामपाल यांचे रक्ताने माखलेले कपडे सापडले आहेत.
या प्रकरणावर पोलीस मंडळ अधिकारी अंशू जैन म्हणाले की, कालव्यात अद्याप मृतदेहाचे तुकडे सापडले नाही आहेत.पण कालव्यात मधले पाणी रोखून शोधकार्य सूरू आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच आरोपी महिला दुलारो देवीने पोलिसांना सांगितले की, रामपाल मला मारहाण करायचा. तसेच त्याने जमीन गहाण ठेवली होती आणि मुलीचेही लग्न करायचे होते. त्यामुळे रविवारी मी एकटीनेच रामपालची हत्या केल्याची कबूली तिने दिली.
हे ही वाचा : Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला
तसेच दुलारो देवीवर असाही आऱोप होत आहे की अनैतिक संबंधातून तिने रामपालची हत्या केली आहे. दुलारो देवीचे मैत्री रामपालचे मित्रासोबत झाली होती. त्यामुळे जेव्हा तिचे रामपाल सोबत भांडण झाले होते, तेव्हा ती त्यांच्या मित्राकडे राहायला गेली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे, या संबंधातून तिने रामपालचा काटा काढल्याचे बोलले जात आहे. अद्याप तरी पोलीस तपासात ही बाब समोर आली नाही आहे. मात्र पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
ADVERTISEMENT