क्रूरतेचा कळस! गुप्तांगात टाकला एअर पाईप, तरुणाचा तडफडून मृत्यू

मुंबई तक

06 Nov 2023 (अपडेटेड: 06 Nov 2023, 01:24 PM)

गुजरातमधील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या बिहारच्या तरुणाच्याबाबतीत एक धक्कादायक बातमी घडली आहे. एअर कॉम्प्रेसरचा पाईप त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली गेल्याने त्याचे पोट फुगल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

working company friend jokingly inserted in air compressor pipe into his private parts

working company friend jokingly inserted in air compressor pipe into his private parts

follow google news

Crime News: माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही. कधी कधी कोणतीही मजा करताना सगळं अंगलट येऊन स्वतःचाच जीव गमवावा लागत असतो. अशीच एक घटना अहमदाबादच्या वटवा जीआयडीसीमध्ये (Ahmedabad Watawa GIDC) असलेल्या एका कंपनीत घडली आहे. वटवा येथील एरो इंजिनिअरिंग कंपनीचे (Aero Engineering Company) हेल्पर पंकज राय (वय 19) यांचा एका विचित्र घटनेमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मूळचा बिहारचा (Bihar) रहिवासी असलेला पंकज आणि त्याचा मित्र प्रकाश यांच्यामध्ये एका गोष्टीवरुन चेष्टा मस्करी चालू होती. ते दोघं चेष्टा मस्करी करत असतानाच प्रकाशने पंकजच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) एअर कॉम्प्रेसरची नळी घातली. त्यामुळे क्षणात त्याच्या शरीरात हवा भरल्याने पंकजचे पोट फुगून त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

विश्वकर्मांनी फोन केला अन्…

पंकज रायच्या वडिलांनी आता आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी वटवा जीआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ही घटना घडली त्यावेळी पंकजच्या वडिलांचे नातेवाईक विश्वकर्मा यांनी पंकजच्या वडिलांना फोन करुन या दुर्घटनेची माहिती दिली. विश्वकर्मा हे पंकज ज्या कंपनीमध्ये काम करत होता, त्या कंपनीजवळच ते काम करत होते.

हे ही वाचा >>Eknath Shinde : ”बेईमानी करणाऱ्यांना घरी बसवलं”,ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर CM शिंदेंची ठाकरेंवर टीका

प्रायव्हेट पार्टमध्ये एअर

पंकजच्या बाबतीत ही दुर्घटना घडली तेव्हा त्याचे वडिल हैदराबादमध्ये होते. ते तात्काळ हैदराबादहून अहमदाबादमध्ये आले. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, चेष्टा मस्करी करण्यासाठी पंकजच्या मित्रांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एअर कॉम्प्रेसरची पाईप घातल्याने पोटात हवा भरली होती. त्यानंतर तो बेशुद्धही पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मस्ती आली अंगलट

या घटनेची माहिती पंकजचे कॉन्ट्रॅक्टर नारायण भाई यांना विचारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सांगितले की, पंकजबरोबर पिंटूने ही मस्ती करत त्याने एअर कॉम्प्रेसरची पाईप घेऊनही त्याने मस्ती केली होती. तशीच मस्ती त्याने पंकजबरोबर करण्याचा प्रयत्न केला होता.

पोट फुगलं आणि सगळंच संपलं

पिंटूने प्रकाशला एअर कॉम्प्रेसरचा पाईप लोखंडाजवळील बीमवर ठेवून त्याचा व्हॉल्व्ह बंद करण्यास सांगितला होता. त्यावेळी त्या प्रकाशने गंमतीने एअर कॉम्प्रेसरचा पाईप पंकजच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली. त्यामुळे पंकजच्या शरीरात हवा भरली. पोटात हवा गेल्याने तो बेशुद्धही झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.

    follow whatsapp