वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी, दोघा तरुणांनी केली आत्महत्या

मुंबई तक

22 Nov 2023 (अपडेटेड: 22 Nov 2023, 08:57 AM)

वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्याचं दुःख क्रिकेटप्रेमींना नक्कीच झालं आहे. मात्र पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये क्रिकेटचाहत्यांना भारताच्या पराभवाचं दुःख सहन न झाल्याने दोघांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली आहे.

World Cup 2023 final Two youths committed suicide West Bengal and Odisha due to India defeat

World Cup 2023 final Two youths committed suicide West Bengal and Odisha due to India defeat

follow google news

ICC World Cup 2023 Suicide Cases : वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून (Ind Vs Aus) पराभव झाला. त्या पराभवाचे अनेक भारतीयांना प्रचंड वाईट वाटले. मात्र पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरा आणि ओडिशातील (Odisha) जाजपूरमध्ये दोघांनी क्रिकेटप्रेमींनी आत्महत्या (Suicide Case) केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा (Crime) दाखल झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.(world-cup-2023-final-two-youths-committed-suicide-west-bengal-and-odisha-due-to-india-defeat)

हे वाचलं का?

वर्ल्ड कप हरल्याचं दुःख

या आत्महत्या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बांकुडामधील बेलियाटोरच्या चित्रपटगृहाजवळ आत्महत्या केल्याच माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना समजले की, राहुल लोहार नावाच्या युवकाने भारताने क्रिकेटचा सामना हरल्याचा धक्का त्याला सहन न झाल्याने त्याने  रविवारी रात्री 11 वाजता गळफास घेत आत्महत्या केली.

सामना पाहण्यासाठी सुट्टी घेतली पण…

राहुल लोहारचे नातेवाईक उत्तर सूर यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, राहुल हा एका कापड दुकानात काम करत होता. मात्र रविवारी क्रिकेटचा अंतिम सामना असल्याने त्याने त्यादिवशी सुट्टी घेतली होती. सामना सुरु झाल्यानंतर राहुल तो सामना पाहतही बसला होता. मात्र ज्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत झाला त्यावेळी त्याला त्या गोष्टीचे दुःख झाले. भारताकडून सामना हरल्यानंतर त्याने घरात जात आत्महत्या केली. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. त्यानंतर राहुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आता या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा>> 200 दिवसांनी पुन्हा वर्ल्ड कपचा थरार, विराट-रोहितला संघात स्थान मिळणार की नाही?

गळफास लावून केली आत्महत्या

तर अशाच प्रकारे ओडिशामधील जाजपूरमध्येही आत्महत्येची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री 23 वर्षाच्या एका युवकाने भारताने सामना हरल्यामुळे बिंझारपूर परिसरातील राहत्या घरात गळफास घेत त्याने आत्महत्या केली. या प्रकरणात मृत पावलेल्या युवकाचे नाव रंजन दास असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पराभवाचा धक्का

रंजन दास हा गेल्या काही दिवसांपासून मानसिकरित्या आजारी होता. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरू होते. भारताकडून सामना हरल्यानंतर मात्र रंजन दास प्रचंड नाराज झाला होता. भारताने सामना हरल्याचे दुःख त्याला सहन झाले नव्हते. त्यामुळे तो नाराजही झाला होता. त्यानंतर त्याने घरात जात गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

    follow whatsapp