Rape and Murder : जगातील सगळ्यात भयानक सीरियल किलरच्या (Serial killer) कुटुंबीयांनी प्रशासनाकडे मोठी मागणी केली आहे. या सीरियल किलरने किमान 400 मुलांवर बलात्कार करून त्यांची हत्या (Murder) केली असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. हत्या करणाऱ्या त्या आरोपीचे नाव लुईस अल्फ्रेडो गाराविटो होते. 132 मुलांच्या हत्येप्रकरणी त्याला तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) ठोठवण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात 12 तारखेला त्याचे निधन झाले आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचा मृतदेह 40 दिवस शवागारात पडून होता. आता त्याचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी गारवितोच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ADVERTISEMENT
कैद्यांनीही केली असती हत्या
डेली स्टारच्या अहवालानुसार गाराविटोला एप्रिल 1999 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोलंबियातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याला तुरुंगात ठेवण्यात आले असले तरी तुरुंगातील इतर कैदी त्याची हत्या करतील अशी भीती प्रशासनाला कायम होती. त्या कारणामुळे त्याला एकांतात ठेवण्यात आले होते. मात्र याच वर्षी त्याने त्याच्या करण्यात आलेल्या आरोपानंतर त्याने आपल्या आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली होती.
बलात्कार करुन हत्या
गाराविटोने सांगितले की त्याने मुलांवर बलात्कार केला होता व त्यांचा छळही केला होता. त्यानंतर तो त्या मुलांची हत्या करत होता. त्याला 138 हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पुतण्याने गाराविटोचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्या पुतण्याने त्यांचे नाते सिद्ध करण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर केली असल्याने तो आता त्याच्या मृतदेहावर दावा करु शकणार आहे.
हे ही वाचा >> Covid 19 : कोरोना लसीमुळे भारतात होतायेत तरुणांचे मृत्यू?, ICMR चा रिपोर्ट
मानवी हक्काचे उल्लंघन
गाराविटोच्या अंत्यसंस्कारासाठी आता त्याच्या कुटुंबीयाकडे पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी आता महापौरांकडे आर्थिक मदत मागितली आहे. गाराविटोच्या अंत्यसंस्कारामध्ये प्रशासन अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांकडून शोक व्यक्त करत असताना प्रशासन मानवी हक्काचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. कारण 18 नोव्हेंबर ही तारीख अंत्यसंस्कारासाठी निश्चित करण्यात आली होती, मात्र प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिला नसल्यामुळे अंत्यसंस्कारही झाला नाही. त्यावर आता सोशल मीडियावरूनही टीका होत असून गारविटो हा अंत्यसंस्कार करण्याच्या लायकीचा नसल्याची भावना सोशल मीडियावरून व्यक्त होत आहे.
172 प्रकरणात आरोपी
गारविटोवर अल्पवयीन मुलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबतची त्याच्यावर 172 प्रकरणांमध्ये त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. तर उर्वरित 32 प्रकरणांचाही अजून तपास सुरु आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात असताना त्याने बनवलेल्या सांगाड्यांच्या नकाशांच्या आधारे पीडितांची संख्या ही 300 पेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
सोशल मीडियावरुनही भयंकर मागणी
त्याच्या सहकार्यामुळे आणि कोलंबियाने जन्मठेप शिक्षेच्या बंदीमुळे त्याची शिक्षा 22 वर्षांनी कमी केली होती. त्याला 2023 मध्ये पॅरोल मिळणार होता मात्र सोशल मीडियावरील एका युजरने हेक्टर एव्हेलनेडाने म्हटले आहे की, ‘तुम्ही त्याचा मृतदेह कचऱ्यातही फेकू शकता’ तर हेडर रिओस नावाच्या युजरने म्हटले आहे की, ‘तो जिवंत असतानाच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले असते तर चांगले झाले असते असं म्हटले आहे.
ADVERTISEMENT