Lok sabha Election 2024 Maharashtra Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok sabha Election 2024) मध्ये महाराष्ट्रातून नेमकं कोण विजय मिळवणार यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. 2019 विधानसभा निवणडुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही बदलली आहेत. दरम्यान, एबीपी सी-व्होटरने नुकताच त्यांचा नवा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 48 मतदारसंघात नेमकं कोण जिंकू शकतं याबाबत अंदाज वर्तवला आहे. (abp c voter opinion poll who can win in maharashtra 48 constituencies see full list lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार हे तीनही पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या एनडीएला टक्कर देत आहेत. यावेळी सहा महत्त्वाचे पक्ष आमनेसामने असल्याने नेमकं कोण बाजी मारणार याचा अंदाज लावणं काहीसं कठीण आहे. पण याचबाबत एबीपी सी व्होटरने 48 जागांबाबतचा सर्व्हे आता समोर आणला आहे. आपल्या या ओपिनियन पोलमध्ये त्यांनी उमेदवारांनुसार अंदाज वर्तवला आहे.
Opinion Poll नुसार महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोणाची होणार सरशी?
1. रामटेक (चुरशीची लढत)
राजू पारवे - शिवेसना (शिंदे गट) - आघाडीवर
श्यामकुमार बर्वे - काँग्रेस - पिछाडीवर
2. नागपूर (सोपा विजय)
नितीन गडकरी - भाजप - आघाडीवर
विकास ठाकरे - काँग्रेस - पिछाडीवर
3. वर्धा (चुरशीची लढत)
रामदास तडस - भाजप - आघाडीवर
अमर काळे - राष्ट्रवादी (शरद पवार) - पिछाडीवर
4. अमरावती (सोपा विजय)
नवनीत राणा - भाजप - आघाडीवर
बळवंत वानखेडे - काँग्रेस - पिछाडीवर
5. अकोला (सोपा विजय)
अनुप धोत्रे - भाजप - आघाडीवर
अभय पाटील - काँग्रेस - पिछाडीवर
प्रकाश आंबेडकर - वंचित - पिछाडीवर
6. बुलढाणा (चुरशीची लढत)
प्रतापराव जाधव - शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर
नरेंद्र खेडेकर - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
7. भंडारा-गोंदिया (चुरशीची लढत)
सुनील मेंढे - भाजप - आघाडीवर
प्रशांत पडोळे - काँग्रेस - पिछाडीवर
8. गडचिरोली-चिमूर (चुरशीची लढत)
अशोक नेते - भाजप - पिछाडीवर
नामदेव किरसान - काँग्रेस - आघाडीवर
हे ही वाचा>> Opinion Poll: BJP ला 'एवढ्या' जागा, MVA चं वाढलं टेन्शन
9. चंद्रपूर (चुरशीची लढत)
सुधीर मुनगंटीवार - भाजप - आघाडीवर
प्रतिभा धानोरकर - काँग्रेस - पिछाडीवर
10. यवतमाळ-वाशिम (चुरशीची लढत)
राजश्री पाटील - शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर
संजय देशमुख - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
11. हिंगोली (चुरशीची लढत)
बाबूराव कोहळीकर -शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर
नागेश पाटील-आष्टीकर - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
12. नांदेड (चुरशीची लढत)
प्रतापराव चिखलीकर - भाजप - पिछाडीवर
वसंतराव चव्हाण - काँग्रेस - आघाडीवर
13. परभणी (सोपा विजय)
महादेव जानकर - रासप - पिछाडीवर
संजय जाधव - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
14. जालना (सोपा विजय)
रावसाहेब दानवे - भाजप - आघाडीवर
कल्याण काळे - काँग्रेस - पिछाडीवर
15. औरंगाबाद (चुरशीची लढत)
चंद्रकांत खैरे - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
इम्तियाज जलील - एमआयएम - पिछाडीवर
अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर नाही
16. बीड (चुरशीची लढत)
पंकजा मुंडे - भाजप - आघाडीवर
बजरंग सोनावणे - राष्ट्रवादी (शरद पवार) - पिछाडीवर
17. धाराशिव (सोपा विजय)
अर्जना पाटील - राष्ट्रवादी (अजित पवार) - पिछाडीवर
ओमराजे निंबाळकर - शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर
18. लातूर (सोपा विजय)
सुधाकर श्रृंगारे - भाजप - आघाडीवर
शिवाजीराव काळगे - काँग्रेस - पिछाडीवर
19. पुणे (सोपा विजय)
मुरलीधर मोहोळ - भाजप - आघाडीवर
रवींद्र धंगेकर - काँग्रेस - पिछाडीवर
वसंत मोरे - वंचित - पिछाडीवर
20. बारामती (चुरशीची लढत)
सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - आघाडीवर
सुनेत्रा पवार - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - पिछाडीवर
21. शिरूर (सोपा विजय)
अमोल कोल्हे - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - आघाडीवर
शिवाजीराव आढळराव - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - पिछाडीवर
22. मावळ (सोपा विजय)
श्रीरंग बारणे -शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर
संजोग वाघेरे - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
23. सोलापूर (चुरशीची लढत)
राम सातपुते - भाजप - आघाडीवर
प्रणिती शिंदे - काँग्रेस - पिछाडीवर
24. माढा (सोपा विजय)
रणजीतसिंह निंबाळकर - भाजप - पिछाडीवर
धैर्यशील मोहिते-पाटील - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
25. सांगली (चुरशीची लढत)
संजयकाका पाटील - भाजप - आघाडीवर
चंद्रहार पाटील - शिवेसना (ठाकरे गट) - पिछाडीवर
विशाल पाटील - अपक्ष - पिछाडीवर
26. सातारा (चुरशीची लढत)
उदयनराजे भोसले - भाजप - पिछाडीवर
शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
27. कोल्हापूर (चुरशीची लढत)
संजय मंडलिक - शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर
शाहू महाराज छत्रपती - काँग्रेस - पिछाडीवर
28. हातकणंगले (चुरशीची लढत)
धैर्यशील माने - शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर
सत्यजीत पाटील शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
राजू शेट्टी - स्वाभिमानी - पिछाडीवर
29. नंदूरबार (चुरशीची लढत)
हिना गावित - भाजप - पिछाडीवर
गोवाल पाडवी - काँग्रेस - आघाडीवर
30. धुळे (चुरशीची लढत)
सुभाष भामरे - भाजप - आघाडीवर
शोभा बच्छाव - काँग्रेस - पिछाडीवर
31. जळगाव (सोपा विजय)
स्मिता वाघ - भाजप - आघाडी (विजय)
करण पवार - शिवसेना (UBT) - पिछाडी (पराभव)
32. रावेर (सोपा विजय)
रक्षा खडसे - भाजप आघाडीवर (विजय)
श्रीराम पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - पिछाडीवर (पराभव)
33. दिंडोरी (चुरशीची लढत)
भारती पवार - भाजप - आघाडीवर
भास्कर भगरे - राष्ट्रवादी (शरद पवार) - पिछाडीवर
34. नाशिक (चुरशीची लढत)
राजाभाऊ वाजे - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही - (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)
35. अहमदनगर (चुरशीची लढत)
सुजय विखे-पाटील - भाजप - पिछाडीवर
निलेश लंके - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
36. शिर्डी (चुरशीची लढत)
सदाशिव लोखंडे - शिवेसना (शिंदे गट) - पिछाडीवर
भाऊसाहेब वाघचौरे - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
37. पालघर (सोपा विजय)
भारत कामडी - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही - (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)
38. भिवंडी (चुरशीची लढत)
कपिल पाटील - भाजप - पिछाडीवर
सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे - राष्ट्रवादी (शरद पवार) - आघाडीवर
39. कल्याण (सोपा विजय)
श्रीकांत शिंदे - शिवेसना (शिंदे गट) - आघाडीवर
वैशाली दरेकर - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
40. ठाणे (चुरशीची लढत)
राजन विचारे - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही - (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)
41. उत्तर मुंबई (सोपा विजय)
पियूष गोयल - भाजप - आघाडीवर
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही - पिछाडीवर
42. उत्तर-पश्चिम मुंबई (सोपा विजय)
अमोल किर्तीकर - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही - (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)
43. उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) (चुरशीची लढत)
मिहीर कोटेचा - भाजप - आघाडीवर
संजय दिना पाटील - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
44. उत्तर-मध्य मुंबई (सोपा विजय)
महायुती उमेदवार जाहीर नाही - (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही - पिछाडीवर
45. दक्षिण-मध्य मुंबई (सोपा विजय)
राहुल शेवाळे - शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर
अनिल देसाई - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
46. दक्षिण मुंबई (चुरशीची लढत)
अरविंद सावंत - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही - (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो
47. रायगड (चुरशीची लढत)
सुनील तटकरे - राष्ट्रवादी (अजित पवार) - पिछाडीवर
अनंत गीते - शिवेसना (ठाकरे गट) - आघाडीवर
48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (सोपा विजय)
विनायक राऊत - शिवसेना (ठाकरे गट) - पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -(महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)
हे ही वाचा>> LIVE: बारामतीत सुप्रिया सुळेंना आघाडी, पाहा ओपिनियन पोल
ABP C-Voter च्या ओपिनियन पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9 जागा जिंकू शकते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा आणि काँग्रेसला 3 जागांवरच विजय मिळू शकतो. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर एनडीएमध्ये भाजपला 21 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 9 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता येणार नाही असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT