Baramati Lok Sabha Election 2024 : ''मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली'', अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल करत टीका

प्रशांत गोमाणे

27 Apr 2024 (अपडेटेड: 27 Apr 2024, 06:13 PM)

Ajit Pawar criticize supriya sule : बारामतीतल्या सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र यांनी दाखवले, हे मी केलेले आहे. जर तुम्ही ते केले आहे तर भोरमध्ये काय केलंय ते सांगा? भोरमध्ये, वेल्यात काहीच केलं नाही? नुसतीच भाषण, मी पण भाषण करू शकतो. पण भाषण करून पोट भरणार आहे का? याला कृती करावी लागले ना, असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

2014 ला मत मागितली आणि तरी एमआयडीसी पूर्ण केली नाही.

ajit pawar mimicking supriya sule criticize midc bhor velha baramati lok sabha election 2024

follow google news

Ajit Pawar criticize supriya sule : ''मी केलं, मी केलं, मी केलं म्हणत काहींनी (सुप्रिया सुळेंनी) मी केलेल्या कामांचीच पुस्तिका छापली, माझीच अर्धी कामे पुस्तिकेत दाखवली. या आताच्या खासदाराने, अशी नक्कल करत उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर नाव न घेता टीका केली आहे. तसेच तुम्ही भोरमध्ये काय केलंय ते सांगा? भोरमध्ये, वेल्यात काहीच केलं नाही. नुसतीच भाषण केली असा हल्ला देखील अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंवर (supriya sule) चढवला. (ajit pawar mimicking supriya sule criticize midc bhor velha baramati lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

अजित पवार आंबेगावमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंची नक्कल करत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. काही लोक इथे येऊन एमआयडीसीची स्वप्न दाखवून गेली. 2014 ला मत मागितली आणि तरी एमआयडीसी पूर्ण केली नाही. त्यानंतर 2019 ला पुन्हा मत मागायला आलात... मी असतो तर मला लाज वाटली असती, कोणत्या तोंडाने मत मागता, अशा शब्दात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. 

हे ही वाचा : काँग्रेस जिंकली तर मालमत्ता, मंगळसूत्र..?, खरगेंनी दिलं उत्तर

अजित पवार पुढे म्हणाले, ''आताच्या खासदाराने मी केलेल्या कामांची पुस्तिकाच छापली, आणि माझी कामं अर्धी त्याच्यात दाखवली. मी केलं, मी केलं, मी केलं... बारामतीतल्या सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र यांनी दाखवले, हे मी केलेले आहे. जर तुम्ही ते केले आहे तर भोरमध्ये काय केलंय ते सांगा? भोरमध्ये, वेल्यात काहीच केलं नाही?  नुसतीच भाषण, मी पण भाषण करू शकतो. पण भाषण करून पोट भरणार आहे का? याला कृती करावी लागले ना, असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

आतापर्यंत तीन वेळा तुम्ही यांना (सुप्रिया सुळेंना) निवडून दिलं आता तुम्ही  (सुनेत्रा पवार) यांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी मतदारांना करत ''मी भोर ला एमआयडीसी देणार, मी शब्दाला पक्का आहे, असा विश्वास व्यक्त केला.

    follow whatsapp