Anandrao Adsul criticize Navneet Rana : भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून ही उमेदवारी जाहीर होताच अमरावतीच्या जागेवरून महायुतीत धुसफुस सुरु झाली आहे. शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही विरोध कायम आहे. आनंदराव अडसूळ यांनी तर निवडणूक लढवण्याची घोषणा करून राणांविरोधात दंडच थोपटले आहे. त्यामुळे एकीकडे बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच आव्हान त्यामुळे राणांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. (amravati lok sabha election 2024 bjp declare candidate navneet rana bachhu kadu anandrao adsul criticize rana maharashtra politics)
ADVERTISEMENT
नवनीत राणांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत बोलताना अडसूळ म्हणाले की, 'नवनीत राणांच्या विरोधात सगळेच आहेत. बडनेरा ही तिला मतदान करेल की नाही हा एक प्रश्न आहे'. दरम्यान त्याचा प्रचार करावा की नाही. याबाबत आम्ही त्यांना आधीच उत्तर दिले आहे, असे अडसूळ यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : भाजपकडून अमरावतीचा उमेदवार जाहीर, 'यांचं' तिकीट कापलं!
त्या निर्लज्ज आहेत. कुठलंही व्यक्तव्य करतात. पण आम्ही आमची लाज शरम विकली नाही. स्वाभिमान विकलेला नाही. आम्ही आहोत तिथे आहोत आणि आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढायचं म्हटलं तर आम्ही लढू शकतो आणि लढणार पण. मी उमदेवार देणार नाही तर मीच उभा राहणार आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेतून उभे राहणार का? यावर अर्थात असे उत्तर अडसूळ यांनी दिले आहे.
जसे आढळराव पाटील यांनी तिघांच्या संमतीने राष्ट्रवादीतून प्रवेश करून उमेदवारी घेतली होती. शक्यतो मी तसे उभे राहीन. तसेच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे होता. उद्या त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि निकाल लागला तर काय होणार आहे? असा सवाल देखील अडसूळ यांनी उपस्थित केला. तसेच माझ्या नावाचा भापजला विरोध नव्हता, त्यांना कमळावरती बाईच पाहिजे होती, असा हल्ला देखील अडसूळ यांनी चढवला होता.
ADVERTISEMENT