Archana Patil : अजित पवारांनी जाहीर केला उस्मानाबादचा उमेदवार!

मुंबई तक

04 Apr 2024 (अपडेटेड: 04 Apr 2024, 07:15 PM)

Archana patil osmanabad lok sabha constituency : आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या आहेत. त्यातील बहुतांश मतदारसंघ हे 2019 मध्ये शिवसेनेकडे होते.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2024

point

अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार

point

शिवसेनेची जागा मिळाली अजित पवारांना

Archana patil osmanabad lok sabha constituency : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार अखेर जाहीर केला. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Archana Patil is Candidate of Ajit Pawar's Ncp From Osmanabad lok sabha constituency)

हे वाचलं का?

अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

बारामती लोकसभा - सुनेत्रा पवार 
शिरूर लोकसभा - शिवाजीराव आढळराव पाटील
रायगड लोकसभा - सुनील तटकरे
परभणी लोकसभा - महादेव जानकर (राष्ट्रवादीच्या कोट्यातून)
उस्मानाबाद लोकसभा - अर्चना पाटील

हेही वाचा >> अजित पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, काय दिले आदेश?

अजित पवार गटाला 7 जागा? 

महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळतील असं दिसतंय. कारण आतापर्यंत अजित पवार गटाला 5 जागा मिळालेल्या आहेत. त्यांना लक्षद्वीपमध्ये एक जागा देण्यात आली आहे, तर आता नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना मिळणारी ही सातवी जागा असेल.

 

शिंदेंच्या सेनेला करावा लागला मोठा त्याग

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या आहेत. त्यातील बहुतांश मतदारसंघ हे 2019 मध्ये शिवसेनेकडे होते. रायगडची जागा शिवसेनेकडे होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्ममान खासदार असल्याने ती अजित पवारांना दिली गेली.

हेही वाचा >> सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला धक्का, नवनीत राणांना 'सर्वोच्च' दिलासा! 

पण, परभणीमध्ये गेल्यावेळी शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला होता. त्याचबरोबर उस्मानाबादचीही जागाही शिवसेने जिंकली होती. या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या आहेत. त्याचबरोबर आता नाशिकची जागाही अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे. तर बारामतीची जागा ही भाजपकडे होती, जी राष्ट्रवादीला मिळाली आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा शिवसेनेला करावा लागल्याचे दिसत आहे. 

    follow whatsapp