Ashok Chavan : 'माझी बदनामी नको असेल, तर...'; चव्हाणांची भावनिक साद

मुंबई तक

• 12:21 PM • 19 Apr 2024

Ashok Chavan Latest News : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते अशोक चव्हाण हे सध्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी गावागावात फिरताना दिसत आहेत.

अशोक चव्हाण नांदेड लोकसभा जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे.

एका प्रचार सभेत बोलताना भाजपचे नेते अशोक चव्हाण.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

अशोक चव्हाणांकडून लोकसभा मतदारसंघात प्रचार

point

समर्थकांना प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून देण्याचे आवाहन

Ashok Chavan, Nanded Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजप गेलेल्या अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपला जड जाताना दिसत असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात सुरू असून, अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे त्याला आणखी हवा दिली आहे. (Ashok Chavan appeal to his supporters that cast vote to bjp candidate)

हे वाचलं का?

अशोक चव्हाण यांनी भाजपत गेल्यानंतर आता प्रतापराव चिखलीकर यांचा प्रचार सुरू केला आहे. ते गावागावांत फिरत आहेत. समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. काही ठिकाणी त्यांना मराठा समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले. पण, आता चव्हाणांनी केलेल्या एका विधानाने सगळ्याचेच लक्ष वेधून घेतले.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

खासदार अशोक चव्हाण प्रचार बैठका घेत आहेत. येहळेगाव परिसरात झालेल्या बैठकीत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, "मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मी नांदेडच्या जागेची गॅरंटी दिली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून गावागावात लीड दिली पाहिजे. येहळेगाव हे गाव माझ्या कारखान्याच्या हद्दीतील आहे. येथून लीड देण्याची तुमची जबाबदारी आहे. वरिष्ठ नेत्यांकडे माझी बदनामी होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल, तर मताधिक्य द्या", अशी भावनिक साद त्यांनी घातली.

हेही वाचा >> आंबेडकरांनी उदयनराजेंविरोधात उतरवला 'वंचित'चा उमेदवार 

चिखलीकरांपेक्षा चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला...

अशोक चव्हाण यांना भाजपने नांदेडची जागा जिंकण्यासाठी पक्षात घेतल्याचे दावे विरोधकांकडून केले जात आहेत. असं असलं तरी सध्या नांदेडच्या निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यापेक्षा अशोक चव्हाण यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे ते मतदारसंघात जास्त फिरताना दिसत आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांशी आणि गावागावांत जाण्याचे प्रयत्न करत आहेत. 

2019 मध्ये कुणाला किती मिळाली होती मते?

गेल्यावेळी म्हणजे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती.

हेही वाचा >> नागपूर ते गडचिरोली... 2019 मध्ये पाच मतदारसंघात काय होती स्थिती? 

या निवडणुकीत काँग्रेसकडून अशोक चव्हाण, तर भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर हे रिंगणात होते. चिखलीकर यांना 4 लाख 86 हजार 806 इतकी मते मिळाली होती. तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 इतकी मते मिळाली होती. 

वंचित फॅक्टरने बदलला निकाल

काँग्रेसची पारंपरिक मते ही वंचित बहुजन आघाडी वळत असल्याचे मागील निवडणुकीत दिसून आलं. काँग्रेसला याचा फटका नांदेड लोकसभा निवडणुकीत बसला होता. वंचित बहुजन आघाडीच्या प्रा. यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार 196 इतकी मते मिळाली होती. 

चव्हाण विरुद्ध पाटील चिखलीकर

यावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याविरोधात काँग्रेसने वसंतराव चव्हाण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चिखलीकर यांना हॅटट्रिक करता येणार की, चव्हाण जायंट किलर ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

    follow whatsapp