Bacchu Kadu : "आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभा, परवानगी रद्द होताच कडूंचा रौद्रवतार

हर्षदा परब

23 Apr 2024 (अपडेटेड: 23 Apr 2024, 06:13 PM)

Bacchu Kadu Latest News : बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले.

बच्चू कडूंच्या सभेची परवानगी नाकारण्यात आली.

बच्चू कडू यांनी परवानगी नाकारल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

बच्चू कडू यांच्या सभेची परवानगी रद्द

point

नवनीत राणा-बच्चू कडूंमध्ये मैदानावरून वाद

Bacchu Kadu Science Score Ground : अमरावतीतील सायन्स स्कोर मैदानावरून आज बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बच्चू कडू यांच्या सभेला परवानगीर मिळालेली असताना अमित शाह यांच्या सभेमुळे ही परवानगी नाकारण्यात रद्द करण्यात आली. यावरून बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले. (bacchu Kadu Gets Angry after police cancel permission of Rally at science score ground)

हे वाचलं का?

सभेची परवानगी रद्द केल्यानंतर बच्चू कडू मैदानावर आले. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरले. 

बच्चू कडू काय बोलले... वाचा जसंच्या तसं

"गृहमंत्र्यांची सुरक्षा हा विषय इथे नाही. तो त्या पार्टीचा विषय आहे. तुम्ही त्या पार्टीचा विषय का घेता? आमची परवानगी चुलीत गेली. परवानगीचा टेबल कशाला ठेवला? त्यांची परवानगी तुम्ही आम्हाला सांगत आहात. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का?"

संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ पहा

"गृहमंत्र्याला विनापरवानगी सभा घेता येते का? तुम्ही काय करा, भाजपचा दुप्पटा घालून या. आता कायदा नाही राहिला." 

"उद्या आमच्या घरातही घुसा. वर्दीवाल्यांना असं शोभत नाही. सुरक्षा इतकी महत्त्वाची आहे तर सभा घेऊन नका असं सांगा त्यांना. असं त्यांना म्हणता येत नाही का? असं म्हटलं तर तुमचे वांधे होतील ना. आम्हाला परवानगी असताना..."

"आता तुम्ही तिकीट घ्या.. आता तुमची कॅसेट जाते, तुम्हाला तिकीट मिळेल. घ्या आमदारकी भाजपची. मस्त जमतं तुमचं. आमची परवानगी असताना, २३ ते २४ पर्यंत आमचं मैदाना आहे, हे स्पष्ट म्हटलं आहे, तरी तुम्ही म्हणताहेत की, सुरक्षा आहे. सुरक्षेमुळे कायदा पाळत नसतो. सुरक्षा महत्त्वाची असते. असं तुम्हाला मस्त समजून सांगता येतं. वर्दीची बेईज्जती तुम्ही केली."

हेही वाचा >> "शिंदेंनी सांगावं की, मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते?"

"या गोष्टीची थोडी तरी शरम वाटली पाहिजे. गुलाम झाले तुम्ही. लोकांना दिसू राहिले. परवानगी आमच्याजवळ आणि सुरक्षा त्यांची (अमित शाह). तुम्ही आम्हाला आतमध्ये टाकून द्या. मग तुम्ही पोलीस महासंचालकच होऊ जाता... जमून जातं तुमचं. पुरस्कार भेटते."

"आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथे आलो. परवानगी नसती तर नसतो आलो. तुम्ही काय म्हणताय परवानगी आहे, पण अमित शाह येताहेत आणि सुरक्षेच्या कारणामुळे तुमची परवानगी फाडून टाका", असं म्हणत बच्चू कडूंनी हातातील कागद फाडून टाकला.

हेही वाचा >> शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुती गुलाल उधळणार का?

"सुरक्षेच्या नावाने तुम्ही कसा आम्हाला टेंभा घालू राहिले. कसं बीजेपीचं काम करू राहीले, मस्त. या कागदाला काही किंमत नाही राहिली. हा ठेवा तुमच्याकडे. कायदा काय म्हणतो. आम्ही उद्याची तयारी कशी करायची? तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का?"

"एवढी लाचारी नको. राजीनामा दिलेलं बरं. पिक्चरमध्येही असं दाखवत नाही. एवढी लाचारी...? किती लाचारी आहे, एकदा मनाला विचारा... तुम्ही किती लबाड बोलता... परवानगी आमची आहे आणि सुरक्षेचं नाव घेऊन तुम्ही आम्हाला दटावू राहिले."

हेही वाचा >> भाजपला 'डीएमके' फॅक्टरची चिंता! कुठे बसू शकतो फटका?

"गुलामी मस्त आहे. इंग्रजांकडे लोक होते ना, भारतीय... तशी तुमची अवस्था झाली. तुम्ही कायदा सगळा चुलीत टाकला. त्यांच्याजवळ परवानगी नाही. आमच्याजवळ परवानगी नाही. काय मिलीभगत आहे. तुम्हाला वाटत नाही का, गुलामी आहे."

"गृहमंत्री येताहेत, तर आमची परवानगी नाकारता. तुम्ही कायदा बोलायचं नाही. तुमच्या तोंडात शोभत नाही. शिंदे नावाचे लोक चांगले असते हो. असे नसतात. (पोलीस अधिकाऱ्याला उद्देशून)"

    follow whatsapp