Lok Sabha : 'गुवाहाटीला जाण्यापूर्वी ठाकरेंना फोन केला, पण ...', बच्चू कडूंचा मोठा गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

25 May 2024 (अपडेटेड: 25 May 2024, 07:43 PM)

Bacchu Kadu Big Revealation : 'राजकारणात काहीही घडू शकतं. पाच वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येतं. तसेच यावेळी आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

bacchu kadu big revealation on udhhav thackeray shiv sena rebel eknath shinde mla in guwahati

राजकारणात काहीही घडू शकतं.

follow google news

Bacchu Kadu Big Revealation : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी करून 40 आमदारांसह गुवाहाटी गाठली होती. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापणेची तयारी सूरू केली होती. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ तुम्हाला ठाऊक असेलचं. पण आता याच घटनेवर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. (bachhu kadu big revealation on udhhav thackeray shiv sena rebel eknath shinde mla in guwahati) 

हे वाचलं का?

बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बच्चू कडू म्हणाले, 'मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता. तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार तिकडे पोहोचले होते. उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला, माझ्याशी बोलले, पण फार काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे मी फोन ठेवून दिला', असे बच्चू कडू यांनी सांगितले.

हे ही वाचा : 'ड्रायव्हरला डांबून ठेवलं, जीवे मारण्याची धमकी...', पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा

बच्चू कडू पुढे म्हणाले, 'राजकारणात काहीही घडू शकतं. पाच वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येतं. तसेच यावेळी आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे चुलत बंधू त्यांच्याविरोधात लढत होते. जनतेने राजकारण मनावर घेऊ नये. त्यांनी मतदान मनावर घेतलं पाहिजे. जनता अनेकदा हे विसरते', असंही बच्चू कडू म्हणाले. 

दरम्यान अमरावती लोकसभेच्या निकालावरही बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली. 'लहान मुलाला जरी विचारलं तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार आहे. रवी राणामुळेच नवनीत राणा अमरावती लोकसभा निवडणुकीत पडणार आहे. दोन वर्षे जर रवी राणा चूप राहिला असता,तर आज चित्र वेगळ असतं', असा टोला देखील कडू यांनी रवी राणा यांना लगावला. 

हे ही वाचा : "कीर्तिकरांचा निर्णय तीन दिवसांत होणार", शिंदेंचा नेता काय बोलला?

 

    follow whatsapp