Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंचा पत्ता कट?; शांतिगिरी महाराजांनी भरला अर्ज

मुंबई तक

29 Apr 2024 (अपडेटेड: 29 Apr 2024, 02:02 PM)

shantigiri maharaj files nomination from Nashik Lok Sabha : हेमंत गोडसे यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशातच सोमवारी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.

शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराजांनी भरला अर्ज.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

Nashik Lok Sabha Election, Hemant Godse, shantigiri maharaj : (प्रविण ठाकरे, नाशिक) नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्ममान खासदार हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज याांनी उमेदवारी अर्ज् दाखल केला असून, आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केला असल्याची माहिती त्यांनी दिली. (shantigiri maharaj files nomination from nashik lok sabha as shiv sena candidate)

हे वाचलं का?

महायुतीच्या जागावाटपाची घोषणा ज्या जागांवरून रखडली आहे, त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन वेळा शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार राहिले आहेत. ही जागा शिवसेनेकडेच राहावी म्हणून एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न सुरू आहेत. 

दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे. छगन भुजबळ यांचे नाव अमित शाह यांनी सूचवले होते, पण त्यावर काही निर्णय होत नसल्याने भुजबळ यांनी माघार घेतली. 

भुजबळ यांच्या माघारीनंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल, अशी शक्यता होती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांत जागेचा पेच फसला आहे. त्यातच आता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेल्या शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरला -शांतिगिरी महाराज

कोणत्या शिवसेनेकडून तुम्ही अर्ज दाखल केला आहे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, " एकनाथ शिंदे गट. आमची जी लोकसभेची कमिटी आहे, तिने हा निर्णय घेतला आहे. आमच्या लोकांनी शिंदेंसोबत परस्पर चर्चा केली, त्यासंदर्भात काही सांगू शकत नाही. एकनाथ शिंदे म्हणाले की, योग्य तो निर्णय घेऊ."

 शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने भरला असला, तरी त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 

 

    follow whatsapp