Vidhan Parishad Election : अजित पवारांच्या उमेदवाराविरोधातच भाजपने दिला उमेदवार!

ऋत्विक भालेकर

03 Jun 2024 (अपडेटेड: 03 Jun 2024, 01:10 PM)

Maharashtra Vidhan Parishad Elections 2024, BJP Candidates : विधान परिषदेेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपने मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

अजित पवारांच्या उमेदवारांविरोधात भाजपने उतरवला उमेदवार.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२४

point

भाजपने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली

point

निरंजन डावखरे, किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांना उमेदवारी

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणूक एकजुटीने लढणाऱ्या महायुतीमधील मित्रपक्ष विधान परिषद निवडणुकीत स्वबळ दाखवताना दिसत आहे. गेल्यावेळी शिवसेना जिंकून आलेल्या मतदारसंघांवर भाजपने कब्जा केला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार उतरवलेल्या मतदारसंघातही आपला उमदेवार दिला आहे. दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे उमेदवार दिला असून, या मतदारसंघातही भाजपने उमेदवार उतरवला आहे. (BJP Nominate Niranjan davkhare, kiran Shelar and shivnath darade for vidhan parishad elections 2024)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांसमोर आले आहेत. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, तीन जागा भाजपने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 

भाजपचे तीन उमेदवार कोण?

कोकण पदवीधर मतदारसंघ - निरंजन डावखरे
मुंबई पदवीधर मतदारसंघ - किरण शेलार
मुंबई शिक्षक मतदारसंघ - शिवनाथ दराडे

अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप

विधान परिषदेच्या तिन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होताना दिसत आहे. भाजपने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, यातील एका मतदारसंघात अजित पवारांच्या उमेदवारांविरोधात उतरवला आहे.

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये 'हे' उमेदवार जिंकणार? बघा संपूर्ण यादी 

मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून आता भाजपने शिवनाथ दराडे यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे.

डॉ. दीपक सावंत यांचा पत्ता कट

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून डॉ. दीपक सावंत हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. ही जागा शिवसेनेने जिंकली होती. त्यामुळे तिच्यावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला होता. पण, भाजपने किरण शेलार यांची उमेदवारी जाहीर केली. 

कोकण पदवीधर : भाजप मनसे आमने सामने; काँग्रेसकडून कीर

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून मनसेने अभिजीत पानसे यांना तिकीट दिले असून, काँग्रेसने रमेश कीर यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >> शरद पवार 'इतक्या' जागा जिंकणार? अजित पवारांना किती? पाहा यादी 

आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे इच्छुक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला आहे. त्यांनी अर्ज भरला तर या मतदारसंघात चौरंगी लढत होईल. 

 

    follow whatsapp