Nandurbar Constituency: राज्यात एकीकडे थंडी वाढतेय, मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण चांगलंच तापलंय. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तशी नेत्यांच्या भाषणाची धार वाढत जातेय. मविआ आणि महायुतीकडून प्रचारासाठी नेत्यांची मोठी फौज उतरवण्यात आली आहे. त्यातच आज नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवच हे भारताचे पहिले मालक आहेत असं म्हणत बिर्सा मुंडा यांची आठवण करुन दिली. तसंच पंतप्रधान मोदी तुम्हाला वनवासी म्हणतात, पण संविधान तुम्हाला आदिवासी म्हणतं असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. जल, जंगल, जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे असं राहुल गांधी म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Kalamnuri Vidhan Sabha : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना धक्का, पैसे वाटल्याच्या आरोपात आमदारावर गुन्हा दाखल
आदिवासी बांधव देशात 8 टक्के आहेत, त्यांचा वाटाही तेवढाच हवा. पण 100 रुपयांपैकी फक्त 10 पैसे एवढाच वाटा त्यांना दिला जातो. देश चालवणाऱ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त एक अधिकारी आदिवासी आहे असं राहुल गांधी म्हटले. पंतप्रधान मोदी जेवढं कर्ज अरबपती लोकांना देतायत, तेवढा खर्च आम्ही आदिवासी बांधवांवर करु असं राहुल गांधी म्हणाले. तसंच आपलं सरकार आल्यास आपण आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही तोडून टाकू असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
आदिवासी भगिनींशी बोलताना ते म्हणाले की, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना खटाखट 3000 रुपये टाकणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारचं जर सरकार आलं तर महिलांसाठी, आदिवासींसाठी मोठे निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. जर आमचं सरकार आलं, तर तुम्ही बाजारात गेल्यावर बससाठी पैसे लागणार नाहीत. महिलांसाठी प्रवास मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार, आम्ही शेतकऱ्यांच्या पीकाला भाव देणार अशी आश्वासनं राहुल गांधी यांनी दिली आहेत.
ADVERTISEMENT