PM Modi : "डरो मत, भागो मत", मोदींनी राहुल गांधींची उडवली खिल्ली

मुंबई तक

03 May 2024 (अपडेटेड: 03 May 2024, 01:01 PM)

Dara Mat, PM Modi Vs Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना चिमटा काढला. राहुल गांधी वायनाडबरोबरच रायबरेली लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत.

राहुल गांधींना मोदींनी काढला चिमटा.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना केलं लक्ष्य

point

रायबरेलीतून निवडणूक लढवण्यावरून साधला निशाणा

point

पंतप्रधान मोदींनी 'डरो मत'वरून काढला चिमटा

PM Modi on Rahul Gandhi Nomination from Raebareli : केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघाबरोबरच काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढत आहेत. काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'डरो मत, भागो मत' म्हणत त्यांची खिल्ली उडवली. (PM Taunt to Rahul Gandhi after congress nominated him from raebareli)

हे वाचलं का?

सोनिया गांधी खासदार राहिलेल्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे. तर अमेठी लोकसभा मतदारसंघातून किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. चर्चा अशा होत्या की, राहुल गांधी हे अमेठी, तर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवतील. पण, प्रियांका गांधी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. 

PM मोदी राहुल गांधींच्या उमेदवारी काय म्हणाले?

काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी दिल्यानंतर मोदींनी राहुल गांधींना चिमटा काढला. पश्चिम बंगालमधील वर्धमान-दुर्गापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत आधी सोनिया गांधींबद्दल बोलताना मोदी म्हणाले, "काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्या, निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नाही. त्या घाबरून पळून जातील. त्या राजस्थानमध्ये गेल्या आणि राजस्थानमधून राज्यसभेत आल्या."

हेही वाचा >> शिवसेनेच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट!

"मी आधीच सांगितलं होतं की, शहजादे वायनाडमध्ये हारणार आहेत. पराभवाच्या भीतीने, वायनाडमधील मतदान जसे संपेल, तसे ते दुसरी जागा शोधायला लागतील. आणि आता दुसऱ्या जागेवरही... त्यांचे सर्व समर्थक म्हणत होते की, अमेठीत येणार... पण अमेठीलाही इतके घाबरले की, तिथून पळून जाऊन आता रायबरेलीमध्ये रस्ता शोधत आहेत", असे मोदी राहुल गांधींच्या उमेदवारीवर म्हणाले.

हेही वाचा >> भाजप-एनडीए किती जागा जिंकेल? पवारांनी थेट आकडाच सांगितला

 

डरो मत... मोदी राहुल गांधींना काय म्हणाले?

"हे लोक फिरून फिरून सर्वांना सांगतात की, डरो मत... डरो मत. मी पण आज त्यांना सांगतो आणि मनापासून सांगतो की, अरे डरो मत, भागो मत. आज मी आणखी एक गोष्ट सांगतो. काँग्रेस यावेळी पूर्वीपेक्षाही कमी जागांवर निवडून येणार आहे. ते आधीच कमी जागा लढताहेत. आता देशही समजू लागला आहे की, हे लोक निवडणूक जिंकण्यासाठी लढत नाहीयेत. हे देशाला वाटण्यासाठी निवडणुकीचा वापर करत आहेत", असे मोदी म्हणाले. 

    follow whatsapp