Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी मी युर्टन घेतोय, माझ्या... ", फडणवीसांनी टाकला राजकीय बॉम्ब

मुंबई तक

19 May 2024 (अपडेटेड: 19 May 2024, 11:38 PM)

Devendra Fadnavis, Lok Sabha 2024 : 'उद्धवजी आणि मी युतीची बोलणी करत बसलो होतो. एक रात्र अशी आली जेव्हा आमच्या सर्व बोलण्या संपल्या आणि उद्धवजी मला म्हणाले, आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी त्यांना म्हटलं हा माझा निर्णय नाही आहे, वरिष्ठ पातळीवर तो निर्णय होईल आणि जो निर्णय होईल तो मला मान्य असेल, असे फडणवीस यांनी ठाकरेंना त्यावेळी सांगितले.

devendra fadnavis interview udhhav thackeray and amit shah discussion motoshree bjp shiv sena alliance lok sabha 2024

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली होती.

follow google news

Devendra Fadnavis, Lok Sabha 2024 : ज्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या शब्दावरून भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. त्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करताना मातोश्रीवर नेमकं काय घडलं होतं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली होती. या घटनेवरच खुलासा करताना राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. मातोश्रीवर सगळं ठरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला सांगितल मी युटर्न घेतोय. पत्रकार परिषदेत तुम्ही एकटेच बोला, बोलताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी मिळालं आहे, असे ठाकरेंनी मातोश्रीवर मला सांगितल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (devendra fadnavis interview udhhav thackeray and amit shah discussion motoshree bjp shiv sena alliance lok sabha 2024) 

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत फडणवीसांनी मातोश्रीवरचा तो संपूर्ण प्रसंग सांगितला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''उद्धवजी आणि मी युतीची बोलणी करत बसलो होतो. एक रात्र अशी आली जेव्हा आमच्या सर्व बोलण्या संपल्या आणि उद्धवजी मला म्हणाले, आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी त्यांना म्हटलं हा माझा निर्णय नाही आहे, वरिष्ठ पातळीवर तो निर्णय होईल आणि जो निर्णय होईल तो मला मान्य असेल'', असे फडणवीस यांनी ठाकरेंना त्यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis : फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story

''उद्धवजी म्हणाले मी हा विषय त्यांच्या (अमित शाहा) कानावर टाकला आहे. त्यानंतर रात्री 1 वाजता मी त्यांना (अमित शाहा) फोन केला.मी म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतायत अडीच वर्षाच मुख्यमंत्रीपदाबाबत तुमच्याशी बोलण झालं आहे. ते म्हणाले माझ्याशी असं बोलण झालं नाही. आणि आपण हे देऊ शकत नाही. तुम्ही त्याना सांगा आम्ही तुम्हाला उप मुख्यमंत्री पद देऊन आणखी काही मंत्रीपदे देऊ. पण मुख्यमंत्री पद काही देता येणार नाही'', असे अमित शाहा यांनी मला फोनवर स्पष्ट म्हटल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

''अमित शाहांसोबत फोन झाल्यानंतर आम्ही पुन्हा बसलो आणि मी त्यांना म्हटलं माझ्या पक्षाला हे काय मान्य नाही. आम्ही अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद काय देऊ शकत नाही. मग ते (ठाकरे)  म्हणाले मला काय आता बोलणी करायची नाही. त्यानंतर आम्ही दोघे बोलणी तोडून निघून गेलो. त्यानंतर पुन्हा तीन दिवसानंतर एका मध्यस्थामार्फत निरोप पाठवला.एकदा पुन्हा आपल्याला बसले पाहिजे. ठीक आहे पण अजून काही गोष्टी देऊ शकलात तर आपण बोलण पुढे करू'', असे ठाकरेंतर्फे सांगण्यात आल्याचे फडणसांनी सांगितले. 

''आम्ही पुन्हा बसलो आणि त्यावेळेस ठाकरे म्हणाले की पालघरची जागा आम्हाला द्या. त्यासोबत विधानसभेच्या आमच्या जागा वाढल्या पाहिजेत. मागच्या वेळेस आम्हाला 12 मंत्री मिळाले होते, आम्हाला जास्त मंत्रीपदे मिळाली पाहिजेत. कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत. जास्त पोर्टफोलिओ पाहिजेत, अशा मागण्या ठाकरेंनी केल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. यावर मी त्यांना म्हटलं ठिक आहे त्यावर चर्चा करू. आणि अमितभाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊ'', असे ठाकरेंनी फडणवीसांना सांगितलं.

हे ही वाचा : "शरद पवार म्हणतात ते खरं आहे, मला 2004 पासून भाजपसोबत...",

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ''मातोश्रीवर येण्याच्या एक दिवस आधी अमित शाह यांनी मला फोन केला आणि म्हणाले, तुम्ही एकदा त्यांच्याशी (ठाकरे) बोलून घ्या, जे ठरलंय तेच होईल. नवीन गोष्टी उघडायच्या नाहीत. असे सांगितल्यावर मी ठाकरेंना म्हटलं, आता मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा काढू नका.यावर ते म्हणाले मी त्यांना माझ्या मनातल्या गोष्टी सांगायला मातोश्रीवर बोलावलं होतं. शेवटी आपला इतका वाद झाला. बाळासाहेबांना जी वागणुक मिळायची ती आम्हाला मिळाली नाही. आम्हाला जी खाती पाहिजे ती केंद्रात देखील त्यांनी दिली नाही, त्यामुळे मला मनातलं बोलून मोकळं व्हायचंय, असे ठाकरेंनी फडणवीसांना सांगितलं. यावर मी त्यांना सुचवलं तुम्ही अमित शाह यांच्याशी एकट्यात बोला. मी अमित शाह यांना सांगितल आणि नो न्यु इश्यु जायचं नाश्ता करायचा 10-12 मिनिटात त्यांच्याशी बोलायचं.त्यानुसार ते अमित शाह यांच्याशी बोलले.''

''अमित शाह यांच्याशी बोलणी झाल्यानंतर त्यांनी नंतर मला आत बोलवलं आणि सांगितलं. बघा देवेंद्र मी युर्टन घेतोय. मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार? त्यामुळे आम्ही दोघंही बोलणार नाही.तुम्ही एकटेच बोला. बोलताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी मिळालं आहे.  यातला एक शब्द खोटा सांगत नाही आहे. हे उद्धव ठाकरे मला खोलीत बोलले. मी इतका टोकाचा निर्णय घेतलेला आणि आता युटर्न घेतलाय. त्यामुळे तुमच्या वक्तव्यात ते येऊ द्या. त्यानतर मी त्यांना ते बोलून दाखवलं. मग त्यांनी वहिनींना बोलावलं. त्यांच्यासमोरही मी बोलून दाखवलं. पुन्हा ब्लुसीमध्ये काय बोलायचं ते मी बोलुन दाखवलं,मग तेच हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर ठरलं प्रश्नोत्तर करायचं नाही. ते अमित भाईंना बोलले तुम्ही आणि आम्ही बोलायचं नाही फक्त फडणवीस बोलतील आणि तुम्ही ब्लुसीची प्रेस काढा फक्त मी बोललो, ते दोघेही बोलले नाही. हे सगळं असं सत्य आहे'', असे फडणवीस यांनी सांगितले आहे. 
 

    follow whatsapp