Vinod Tawde Virar : भाजप नेते विनोद तावडे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात आहेत. उद्या राज्यात मतदान पार पडणार आहे. त्यातच आज विनोद तावडे हे विरारमध्ये असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप करत हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेतलं असून, बरीच मोठी बाचाबाची झाली. विनोद तावडे यांना पैसे वाटताना पडकलं असून, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांना उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत इथेच डांबून ठेवू असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी याप्रकरणी विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT
हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंची लाज काढली
पाच कोटी वाटले जात होते, यांच्या काही डायऱ्या माझ्याकडे आहेत, कुठे काय वाटप झालं ते आहे, हे विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, हे शिक्षणमंत्री होते, लाज शरम आहे का? विनोद तावडेंनी मला 25 फोन केले आणि मला जाऊ द्या, मला माफ करा असं म्हणत आहेत असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. राष्ट्रीय नेता इथे पैसा वाटपासाठी आले का? असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
प्रत्येक भागात किती वाटप करायचेत असं यामध्ये लिहिलं असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरुन ठेवलं असून, पोलिसांनी, निवडणूक आयोगाने कारवाई करावी अन्यथा उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विनोद तावडे आणि राजन नाईक याना मी माझ्यासोबत इथेच मुक्काम करावा लागेल असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
विनोद तावडे या विरार पूर्वमध्ये असलेल्या विवांत या हॉटेलमध्ये आलेले असताना हा प्रकार घडल्याचं कळतंय. त्यांच्या सोबत यावेळी नालासोपारा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजन नाईक हे देखील उपस्थित असल्याचं कळतंय. या प्रकरणावरुन आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही आरोप करण्यात येत आहेत.
"भाजपचा खेळ खल्लास... जे काम निवडणूक आयोगानेच करायला पाहिजे होते, ते काम ठाकुरानी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो!" असं म्हणत संजय राऊत यांनी याप्रकरणावरुन प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT