Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. काल संध्याकाळी सहा वाजेपासून प्रचार बंद करण्यात आला असला तरी, राज्यभरातील काही घटनांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे. काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ले झाले, तर काही ठिकाणी रोख रक्कम जप्त करण्यात आली, तर काही ठिकाणी अन्य प्रकार घडले. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. यामध्ये मतदारांना पैसे वाटून बोटाला शाई लावल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी यावरुन आरोप करत संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात केले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Balasaheb Thackeray : "उद्धव आणि नितीन गडकरींना...", 2011ला बाळासाहेब सेना-भाजप युतीबद्दल काय म्हणाले होते पाहा!
राज्यात उद्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान आहे. मात्र आता ऐन निवडणुकीच्या एक दिवस आधी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोटाला शाई लावून, मतदान कार्ड जमा करुन पैसे वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीवेळ चांगलाच गोंधळ झाल्याचं समजतंय. तसंच पोलिसांनी 18 लाखांची रक्कम जमा करुन 2 कोटी सोडून दिलेत असं म्हणत संजय शिरसाट यांनी फोन केल्याचा आरोप केला आहे.
अंबादास दानवे यांनी काय आरोप केलेत?
अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनरमध्ये घडलेल्या या प्रकारावरुन थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी." अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT