Hitendra Thakur: 'तावडेंनी पैसे आणले ही माहिती मला भाजपमधल्या मित्रांनीच दिली', हितेंद्र ठाकूर हे काय बोलून गेले?

मुंबई तक

19 Nov 2024 (अपडेटेड: 19 Nov 2024, 02:59 PM)

Vinod Tawde VS Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर हे मीडियासमोरच कोणाशी तरी फोनवर बोलत होते. जो सगळा संवाद मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे

Hitendra Thakur vs Vinod Tawde

Hitendra Thakur vs Vinod Tawde

follow google news

बातम्या हायलाइट

point

विनोद तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलं!

point

हितेंद्र ठाकूर यांनी केले गंभीर आरोप

point

हितेंद्र ठाकूर यांचा संवाद मीडियाच्या कॅमेरात कैद

Vinod Tawde VS Hitendra Thakur: या सगळ्या भाजपच्या डायरी आहेत.. चिन्ह पण आहे बघा त्यांचे.. रवींद्र चव्हाणांचा फोटो असलेली डायरी पण आहे. नाही नाही... पाच कोटी बॅगेमध्ये नाही... पाच कोटी एकूण आणले होते गाडीत. नंतर म्हणतील या बॅगमध्ये 5 कोटी राहतील का? बॅगमध्ये नाही तर 5 कोटी हे कारमधून आणले होते. भाजपमध्ये माझे काही वेलविशर आहेत. मित्र आहेत. त्यांनी मला ही माहिती दिली. 

हे वाचलं का?

बोला ना.. बरेच पैशांचे व्यवहार यामध्ये आहेत डायरीमध्ये. मला माहिती कोणी दिली हे मी सांगितलं तर पुढे मला माहिती मिळेल का? मॅडम अहो तुम्ही मला काय एवढा वेडा समजता का? मला कालच समजलं.. तर मी दुर्लक्ष केलं. म्हटलं असा कोण राजकीय नेता थोडाच येईल पैसे घेऊन. पण आज इकडे येऊन बघतोय तर पैसे पण मिळाले, डायरी पण मिळाले.. डायरी आम्ही दाखवतोय. या सगळ्या डायरी भाजप नेत्यांच्याच आहेत ना.. त्यावर आकडे लिहले आहेत. 

हे ही वाचा >> Vinod Tawde : नालासोपाऱ्यात मोठा राडा! विनोद तावडेंच्या 'त्या' डायरीत काय?

आमची अपेक्षा ही आहे की, पोलीस आणि निवडणूक आयोग यांनी नियमानुसार कारवाई करावी. ही आमची मागणी.. अहो पोलीस आणि निवडणूक आयोग काम करत नाही म्हणून तर आम्हाला यावं लागलं इथे. नावं पण आहेत.. अहो नावाच्या समोरच पैशांचे आकडे आहेत. त्या डायरीत बघा.. यांची नाव घेण्याची लायकी आहे की मी नावं घेण्याची. आमच्यातले काही फुटून गेलेले असतील कोण असतील.. हे सा&  अनधिकृत बांधकाम करणारे आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : विनोद तावडेंना घेरलं, पैसे वाटताना पकडल्याचा आरोप

    follow whatsapp